चीनच्या कुरापती सुरुच; भारताच्या LAC जवळ चौक्या उभारतोय, अमेरिकन खासदाराने व्यक्त केली चिंता

चीनने भारतासोबतच्या एलएसीवर चौक्या बांधल्या आहेत, जे त्याच्या शेजारी देशांवरील चीनच्या आक्रमकतेचे चिंताजनक लक्षण आहे.
indian army says China Building Infrastructure Near Arunachal Border
indian army says China Building Infrastructure Near Arunachal BorderSaam Tv

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील हिंसेनंतर चीनच्या भारताविरुद्धच्या कुरापती जगासमोर आल्या होत्या. त्यानंतर भारताने कडक भूमिका घेत चीनला जशास तसं उत्तर दिलं होतं. मात्र सुधरेल तो चीन कसला असंच म्हणावं लागेल. चीन आपल्या शेजारी देशांसोबत सतत सीमा वादाच्या मुद्द्यावरुन वादात असतो.

भारतासोबतही अनेक दिवसांपासून सीमावाद सुरू आहे, अनेकवेळा परिस्थिती चिघळली देखील आहे. चीन (China News) सतत LAC वर वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे करत आहे, ज्याच्या बातम्या आणि चित्रे रोज समोर येतात. दरम्यान, आता एका अमेरिकन खासदाराने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की चीनने भारतासोबतच्या एलएसीवर चौक्या बांधल्या आहेत, जे त्याच्या शेजारी देशांवरील चीनच्या आक्रमकतेचे चिंताजनक लक्षण आहे. (Latest Marathi News)

indian army says China Building Infrastructure Near Arunachal Border
Viral News : पत्नी प्रियकरासोबत हॉटेलात; पतीने रंगेहाथ पकडलं, भर रस्त्यात तुफान राडा

अमेरिकन सिनेटर राजा कृष्णमूर्ती यांनी एका बातमीवर भाष्य केलं की चीन भारताच्या सीमेवर सतत आपल्या चौक्या बांधत आहे. 'पॉलिटिको' या वृत्तपत्राने दावा केला आहे की, चीनने भारतासोबतच्या विवादित सीमेजवळ लष्करी चौक्या बांधल्या आहेत. त्यानंतर अमेरिकन खासदाराने चीनच्या आक्रमकतेबद्दल चिंता व्यक्त केली.

कृष्णमूर्ती यांनी म्हटलं की,भारत आणि चीनमधील एलएसीजवळ नवीन पीपल्स लिबरेशन आर्मी पोस्टच्या नवी चौक्यासंबंधीची बातमी बीजिंगच्या वाढत्या आक्रमकतेचे आणखी एक चिंताजनक लक्षण आहे. चीन आणि त्याच्या सैन्याबाबत अशा बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा अशा बातम्या येत आहेत की चीन सीमेवर सतत बांधकाम करत आहे.भारताला आव्हान देण्यासाठी चीन सातत्याने आपली रणनीती तयार करत असून सीमेवर आपले सैन्य मजबूत करत असल्याचे बोलले जात आहे.

indian army says China Building Infrastructure Near Arunachal Border
LPG Cylinder Price : डिसेंबरच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर

LAC व्यतिरिक्त चीन सागरी हद्दीत सतत घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. भारतीय नौदलाने अलीकडेच म्हटले आहे की ते हिंदी महासागर क्षेत्रावर लक्ष ठेवत आहेत. देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नौदल कटिबद्ध असल्याचे सांगितले.गेल्या काही महिन्यांत चिनी हेरगिरीचे जहाज दुसऱ्यांदा हिंदी महासागरात घुसल्याच्या वृत्तादरम्यान नौदल सतर्क झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com