कोरोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटचा निष्कर्ष एका तासांत कळणार; अमेरिकेत विकसित झाली covid टेस्ट

आता अमेरिकेतील (America) शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनानुसार कोरोना चाचणीचा निष्कर्ष एका तासात कळणार आहे.
Covid test
Covid test saam tv

नवी दिल्ली : कोरोना (Corona) विषाणूचा पहिला रुग्ण आढळून भारताला तीन वर्ष झाले आहेत. मात्र, तरीही आजही भारतात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना विषाणूने गेल्या तीन वर्षात संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. तर पाश्चिमात्य देशात आता कोरोना विषाणूचे नवंनवे व्हेरिएंट आढळून येत आहे. त्यात कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निष्कर्ष २४ तासात कळतो. त्यानंतर आता अमेरिकेतील (America) शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनानुसार कोरोना चाचणीचा निष्कर्ष एका तासात कळणार आहे. ( New Covid Test Update In Marathi )

Covid test
इंग्लंडमध्ये कोरोनाचा विस्फोट, जून अखेरीस २३ लाख पॉझिटिव्ह; सर्वांना डोकेदुखी

शास्त्रज्ञांचा दावा आहे की, SARS-COV-2 च्या कोणत्याही व्हेरिंएटचा कोरोनाचा निष्कर्ष रॅपिड चाचणीद्वारे एका तासाच्या आत कळणार आहे. या चाचणीला CoVarscan हे नाव देण्यात आलं आहे. टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांनी आतापर्यंत CoVarscan चे ४०० नमुने तपासले आहेत. संशोधकांनी हा शोध 'क्लिनिकल केमिस्ट्री' या जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे. संशोधकाचा असा दावा आहे की, CoVarscan चाचणीच्या माध्यमातून एका तासात कोरोनाचा निष्कर्ष कळेल. ही चाचणी इतर चाचणीपेक्षा उत्तम आहे. CoVarscan चाचणीच्या माध्यमातून कोणत्याही कोरोना विषाणूचा व्हेरिएंट कळू शकतो.

Covid test
इंडिगोचे काही कर्मचारी रजेवर गेल्यानं ५५ टक्के उड्डाणांना फटका, 'हे' कारण आलं समोर

टेक्सास विद्यापीठाचे प्राध्यापक आणि या संशोधनाचे प्रमुख संशोधक जेफरी सोरेले यांनी सांगितले की, CoVarscan या नव्या चाचणीच्या माध्यमातून एका तासात निष्कर्ष कळेल. एखादा नवा व्हेरिएंट जगात आढळून आला तरी त्या कोरोनाचा निष्कर्ष हा या चाचणीच्या माध्यामातून कळेल. जेफरी सोरेले यांनी पुढे सांगितले की, नवनव्या व्हेरिएंटचा परिणाम हा रुग्णावर होत आहे. सध्या आता अनेक कोव्हिड चाचण्या आहेत, त्यातील चाचणीद्वारे आता साधारणपणे कोव्हिड-१९ हा जेनिटिक मटेरियल किंवा छोट्या-छोट्या अणुमधून कळतो. मात्र, नवा व्हेरिएंट कळत नाही. त्यासाठी तो नमुना इतर ठिकाणी पाठवावा लागतो. मात्र, CoVarscan चाचणीमार्फत कोणत्याही प्रकारचा व्हेरिएंटचा निष्कर्ष एका तासांत कळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com