
सध्या सर्व जण धावपळीचे आयुष्य जगत आहेत. या धावपळीच्या जगात आपण खूप गोष्टी विसरतो. कधीकधी तर जेवायलाही विसरतो. जेवणानंतरची औषधं घ्यायला विसरतो. सकाळची औषधं संध्याकाळी घेतो. त्यामुळे खूप त्रास होतो. परंतु एका महिलेने चक्क व्हिटामिनची गोळी समजून एअरपॉड गिळलाय.
अमेरिकेत ही घटना घडली आहे. एका ५२ वर्षीय टीकटॉकरने इअरपॉड गिळले होते. तिने सोशल मीडियावर यासंबंधित मोठा खुलासा केला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही मजेशीर घटना तन्ना बार्करसोबत घडली आहे. तन्ना बार्कर ही प्रसिद्ध टिकटॉकर आहे. तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. तिने हा मजेशीर किस्सा ऑनलाईन शेअर केला आहे.
तन्ना बार्कर आणि तिची मैत्रिण मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती. तिने तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारताना व्हिटामिनची गोळी घेतली. परंतु चुकून तिने गोळीऐवजी इअरपॉड गिळले. यासंबधित तिने सांगितले आहे.
'मी मॉर्निंग वॉकमध्ये अर्ध्या रस्त्यात असताना व्हिटामिनची गोळी घेण्याचे ठरवले. त्यानंतर गोळी घेतली. नंतर माझ्या घशात काहीतरी अडकल्यासारखे मला वाटले म्हणून मी अजून पाणी प्यायले. त्यानंतर मी तिथून निघाली. मी कानात इअरपॉड्स घालायला काढले तर ते इअरपॉड्स नसून विटामिनची गोळी होती. त्यानंतर मला लगेच समजले की, मी चुकून इअरपॉड्स गिळले आहे. आता माझ्या पोटात इअरपॉड्स आहेत'. असे तन्ना म्हणाली.
तिने घरी गेल्यावर घडलेली घटना पतीला सांगितली. परंतु तिच्या पतीने तिला ही गोष्ट कोणालाही न सांगण्यास सांगितले. परंतु तिने हा निर्णय तिच्या टिकटॉक फॉलोअर्ससोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला.
तन्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रियाही आल्या आहेत. 'जेव्हा इअरपॉड बाहेर येईन तेव्हा त्याची इअरपूड झालेली असेल.' 'मी विचार करतोय की, तुझी मैत्रिण तुला इअरपॉड खाताना बघत होती', अशा कमेंट आल्या आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.