UP Crime News: कसली ही विकृती! गर्भवती सूनेवर सासऱ्याचा अत्याचार; 'तू माझी आई' म्हणत नवऱ्यानेही सोडून दिलं

Uttar Pradesh Muzaffarnagar Crime News: उत्तरप्रदेशच्या मुझफरनगरमध्ये सासऱ्यानेच सुनेवर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
UP Crime
UP CrimeSaam Tv

Uttar Pradesh News: उत्तरप्रदेशमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या मुझफरनगरमध्ये सासऱ्यानेच सूनेवर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे पिडीतेने पतीला याबाबत सांगताच पतीने तिला मारहाण करत तिलाच घराबाहेर हाकलून दिले.

UP Crime
Maratha Andolan: बाबा... तुमचं पोरगं लय भारी; CM शिंदे जरांगे पाटलांच्या वडिलांना काय म्हणाले?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घरात सुन एकटी असल्याचा फायदा घेत सासऱ्यानेच आपल्या गर्भवती सुनेला वासनेचे शिकार बनवले. उत्तर प्रदेशच्या ककरौली पोलीस स्टेशन परिसरातील हे संपूर्ण प्रकरण आहे. पिडीतेचे 19 ऑगस्ट 2022 रोजी गावातील तरुणासोबत लग्न झाले होते.

तरुणीच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. घटनेच्या दिवशी पिडीता घरात एकटी असताना सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत फरार झाला. पिडीतेने संध्याकाळी घरी आल्यानंतर पतीला आपबीती सांगितली.

क्रूर पतीने घराबाहेर हाकलले...

मात्र क्रूर पतीने तिला मदत करण्याऐवजी उलट तिलाच बेदम मारहाण केली. तु आता माझ्या वडिलांची पत्नी आहेस, तुझ्यासोबत राहू शकत नाही, असे म्हणत तिला घराबाहेर हाकलून दिले. पतीनेही घराबाहेर काढल्यानंतर महिलेने आपल्या माहेरी जात संपूर्ण घटनाक्रम नातेवाईकांना सांगितला.

आई-वडिलांच्या मदतीने पीडितीने मीरापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेत पीडित महिलेचा सासरा आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करुन घेतली असून पतीला अटक केली आहे. या प्रकरणातील नराधम सासरा अद्याप फरार आहे. (Latest Marathi News)

UP Crime
Yashomati Thakur News: कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक! नवनीत राणांविरोधात ठोकणार १०० कोटींचा दावा; प्रकरण काय?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com