Lakhimpur : संतापजनक! दोन सख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार; खून करून मृतदेह झाडावर बांधले

लखीमपूरी खैरी भागात दोन सख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsANI

लखीमपूर : देशात महिला अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस महिलावरील अत्याचार वाढतच आहे. एकीकडे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत असतानाच, दुसरीकडे उत्तरप्रदेशातून (Uttar Pradesh) एक संतापजनक बातमी समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील लखीमपूरी खैरी भागात दोन सख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. (Uttar Pradesh Crime News)

Uttar Pradesh Crime News
Funny Video : याला कुणीतरी आवरा रे! भर रस्त्यात मद्यपीचा नागिन डान्स, व्हिडीओ Viral

लखीमपूरी खैरी भागातील निघासन कोतवाली परिसरात ही संतापजनक घटना घडलीये. दोन अल्पवयीन सख्या बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत. दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना घरातून पळवून नेले, बलात्कार करून त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

याप्रकरणी, मृत मुलींच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) 2 नामांकित आणि 3 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना निघासन कोतवाली परिसरातील तमोलिन पूरवा गावामध्ये घडली. मृत मुलींपैकी एक दहावीत शिकणारी तर दुसरी सातवीची विद्यार्थिनी आहे. दोन अल्पवयीन सख्या बहिणींचे मृतदेह सापडल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवत पोलीस स्टेशनला टाळे ठोकले. (Uttar Pradesh Todays News)

Uttar Pradesh Crime News
Viral : चुकून एक्सीलेटर फिरवला अन् स्कूटीवरून धाडकन आदळली तरुणी, VIDEO व्हायरल

संतप्त झालेल्या कुटुंबीयांची आणि जमावाची समजूत काढल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी लखीमपूर खेरी येथे पोस्टमॉर्टमला पाठवले. दरम्यान, मृत मुलींच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी छोटू नामक एका तरुणासह इतर तीन जणांना ताब्यात घेतलंय. घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैणात केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com