Crime News : उत्तर प्रदेशातही आफताबसारखा क्रूरकर्मा; प्रेयसीचे तुकडे करून विहिरीत फेकले

उत्तर प्रदेशातील आजमगढमध्ये अंगावर शहारा आणणारी घटना उघडकीस
Crime News
Crime NewsSaamTv

Uttar Pradesh Crime News : दिल्लीतील (Delhi) श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देश हादरुन गेलेला असतांना आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आजमगढमध्ये अंगावर शहारा आणणारी घटना उघडकीस आली आहे. एका वेड्या प्रियकराने प्रेयसीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी झाल्याच्या रागातून तिचा खून करून तिच्या शरिराचे सहा तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रद्धा खून प्रकरणाप्रमाणेच ही हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेश राज्यातील आझमगड जिल्ह्यात समोर आली आहे. प्रिन्स यादव असे या आरोपीचे नाव आहे. (Uttar Pradesh Latest Crime News)

Crime News
...तर राजकारण सोडेन; उमेश पाटलांचे राजन पाटलांना खुलं आव्हान

९ नोव्हेंबरला आरोपी प्रिन्सने पीडितेला मंदिरात नेले. मंदिरालगत ऊसाच्या शेतात भाऊ सर्वेशच्या मदतीने आरोपीने पीडितेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर या दोघांनी तिच्या शरिराचे सहा तुकडे केले. हे तुकडे प्लास्टिक बॅगमध्ये भरुन आरोपींनी विहिरीत फेकले.

पीडित महिलेचा खून करून आपणच तिचे अवयव विहिरीत टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आले. मात्र, घटनास्थळी शोधकार्य राबवण्यासाठी जाताना पोलिसांशी झालेल्या चकमकीत आरोपीला गोळी लागली आहे. त्यानंतर त्याने पोलिसांच्या तावडीतूनदेखील त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तिकडे दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतांना उत्तर प्रदेशातल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

पीडितेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला असून ही घटना दोन ते तीन दिवस आधी घडल्याची माहिती आजमगढचे पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी दिली आहे. पीडित तरुणी आजमगढ जिल्ह्यातील इशाकपूर गावातील रहिवासी होती. दरम्यान, या हत्या प्रकरणात एक धारदार शस्त्र, एक गावठी पिस्तूल आणि एक काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com