उत्तर प्रदेशच्या निवडणुकांकडे देशाचं नव्हे जगाचं लक्ष होतं - योगी आदित्यनाथ

निवडणूकांचे निकाल जाहीर झाल्यावर योगी आदित्यनाथ यांनी जनतेशी संवाद साधला.
Yogi Adityanath
Yogi AdityanathSaam TV/ ANI

लखनऊ : आज सर्व देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पुन्हा उत्तर प्रदेशच्या जनतेने कौल दिला असून प्रदेशमध्ये आता भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे. (Result of Uttar Pradesh Legislative Assembly)

आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला असता त्यानी प्रंधानमंत्री नरेंद्र मोदी, (PM Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उत्तर प्रेदेशमधील जनतेचे आभार मानले ते आपल्या भाषणात म्हणाले. जनता जनार्दनांनी आशिर्वाद दिल्यानेच चार राज्यात पुन्हा सरकार आणण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली आहे.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकांकडे देशाचंच नव्हे तर दुनियेचं लक्ष होतं आणि अशा या महत्वपुर्ण निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी तसंच आपल्या मित्र पक्षांनी खूप मोलाची साथ दिली मी त्यांचेही आभार मानतो असं योगी आपल्या भाषणात म्हणाले. तसंच ज्या कार्यकर्त्यांमुळे ज भाजपा ला बहूमताने सरकार बनविण्याची संधी मिळाली आहे. त्यांचेही आभार, तसंच प्रदेशात पहिल्यांदाच सात टप्प्यामध्ये आणि शांततापुर्ण मार्गाने ही निवडणूक पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाचे देखील त्यांनी आभार मानले.

मोदींनी मौल्यवान वेळ दिला.

Yogi Adityanath
Goa Election: महाराष्ट्रातील सरकारला आम्ही पर्याय देणार; फडणवीसांच वक्तव्य

योगींनी आपल्या भाषणात पंतप्रधानांच नावं वारंवार घेत त्यांनी उत्तकप्रदेशसाठी खूप वेळ दिला प्रदेशाच्या विकासासाठी मदत केली तसंच त्यांच प्रत्येक गोष्टीत आपल्याला मार्गदर्शन मिळतं त्यासाठी त्यांचे खूप आभार मानतो योगी म्हणाले. 'सबका साथ, सबका विकास' म्हणत आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी राज्याला पुढं घेऊन जायंच आहे डबल इंजिनच्या सरकारने राज्याला सुरक्षा दिली, तसंच राज्याला आस्था देण्याचही काम केलं आहे असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com