Ghaziabad Bus Accident: प्रवाशांनी भरलेली बस दुभाजक तोडून उड्डाणपुलावरून पडली खाली, अपघाताचे भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद; पाहा व्हिडीओ

Ghaziabad Bus Accident Video: प्रवाशांनी भरलेली बस दुभाजक तोडून उड्डाणपुलावरून पडली खाली, अपघाताचे भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद; पाहा व्हिडीओ
Ghaziabad Bus Accident
Ghaziabad Bus AccidentSaam Tv

Ghaziabad Bus Accident Video:

उत्तर प्रदेशातील दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर गुरुवारी भीषण अपघात झाला आहे. गाझियाबादमधील फ्लायओव्हरवरून रोडवेजची बस खाली पडली. या अपघातात सुमारे 24 जण जखमी झाले आहेत, असं 'वृत्त टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बस दिल्लीकडून एक्स्प्रेसवेवर येत होती. दरम्यान, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस हायवेवरून खाली पडली.

Ghaziabad Bus Accident
UP Crime News: वडील पोलीस ठाण्यात विनयभंगाची नोंदवत होते तक्रार, मुलीने घरात संपवलं जीवन; नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस मेरठहून दिल्लीला जात असताना दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर (डीएमई) ही घटना घडली. बस चालक प्रदीप याने पोलिसांना सांगितले की, त्याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण कसे सुटले, हे त्याला माहीत नाही. तो मद्यधुंद अवस्थेत नव्हता. (Latest Marathi News)

घटनेची माहिती देताना डीसीपी विवेक चंद यादव यांनी सांगितलं की, या अपघातात 24 प्रवासी जखमी झाले असून त्यांना संजय नगरच्या संयुक्त सरकारी रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Ghaziabad Bus Accident
Akola Donkey's Pola: अकोटमध्ये आगळीवेगळी परंपरा! पोळ्याच्या दिवशी बैलांचा नव्हे तर गाढवांचा पोळा

सर्व जखमी प्रवासी बिजनौर जिल्ह्यातील असल्याचे डीसीपी यादव यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात हा अपघात कसा झाला, ते दिसत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com