
ललितपूर : पोलीस अधिकाऱ्यानेच तरुणीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) आणखी एक भयंकर घटना घडली आहे. चोरीच्या आरोपाखाली एका महिलेला पोलिसांनीच (Uttar Pradesh Police) निवस्त्र करून बेल्टने मारहाण केली आहे. इतकंच नाही तर, पीडितेला एका बंद खोलीत नेत थर्ड डिग्री टॉर्चर सुद्धा केलं आहे. उत्तरप्रदेशातील ललितपूर (Lalitpur Police) पोलीस ठाणे परिसरात हा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस हवालदारासह एका महिला पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही एका अंशु नामक व्यक्तीच्या घरी स्वयंपाक तसेच साफ सफाईचे काम करते. अंशु हा मेहरौनी ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. २ मे रोजी पीडित महिला नेहमीप्रमाणे स्वयंपाक करण्यासाठी अंशुच्या घरी गेली होती. तेव्हा अंशु याच्या पत्नीने घराचा दरवाजा बंद केला आणि पीडितेला घरात कोंडून घेतले. यानंतर अंशुच्या पत्नीने त्याला फोन केला आणि घरी बोलावून घेतले.
अंशुने पोलीस ठाण्यातून येताना आपल्यासोबत महिला पोलीस उपनिरीक्षक पारुल चंदेला हिला सोबत आणलं. आणि चोरीबाबत पीडितेची चौकशी सुरू केली. इतकंच नाही तर, रात्री ८ वाजेच्या सुमारास अंशू आणि महिला पोलीस पारुल चंदेला हिने घरातील लाईट बंद केली. आणि पीडितेला निर्वस्त्र करत तिला पट्ट्याने जबर मारहाण केली. यादरम्यान पीडितेने आपण चोरी केली नसल्याचं वारंवार सांगितलं. मात्र तरी देखील अंशु आणि चंदेला हे दोघे पीडितेला मारतच होते. त्यांची क्रुरता इतकी वाढत गेली की त्यांनी पीडितेच्या अंगावर चक्क पाणी ओतत तिला वारंवार विजेचे शॉकही दिले.
दरम्यान, प्रकरण चिघळू नये म्हणून दोनही पोलिसांनी पीडितेला पोलीस ठाण्यात आणलं. पती आणि पत्नी यांच्यामध्ये वाद झाल्याचे सांगत पीडितेच्या पतीवर मारहाण केल्याची कारवाई देखील केली. पीडितेवर झालेल्या या अत्याचाराची स्थानिक प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. त्यांनी दिलेल्या वृत्तानंतर आरोपी पोलीस कर्मचारी अंशू पटेल, त्याची पत्नी आणि महिला निरीक्षक पारुल चंदेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन्ही पोलिसांचं निलंबन सुद्धा करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.