Uttar Pradesh: चक्क पत्नीनेच लावलं पतीचं दुसरं लग्न; रहस्य उघड होताच दुसऱ्या पत्नीने केलं असं काही...

लग्नानंतर आपला नवरा आधीच विवाहित आहे हे दुसऱ्या पत्नीला समजले.
Marriage
MarriageSaamTvNews

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, मुलं होत नसल्यामुळे आणि घराणेशाही चालवण्यासाठी महिलेने आपल्याच पतीचे दुसऱ्या महिलेसोबत दुसरे लग्न लावून दिले. लग्नानंतर आपला नवरा आधीच विवाहित आहे हे दुसऱ्या पत्नीला समजले. दुसऱ्या लग्नाची ही गोष्ट कळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. फसवणुकीला बळी पडलेल्या महिलेने पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Uttar Pradesh Latest News)

Marriage
Mumbai: रिक्षा प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच अटकेत

हाथरस येथील रहिवासी असलेल्या रीनाचा विवाह 4 जुलै 2022 रोजी बरौली अहिर भागात राहणाऱ्या अंकुर सोबत झाला होता. लग्न झाल्यावर जेव्हा रीना तिच्या सरासरी गेली तेव्हा तिला आपला पती आधीच विवाहित असल्याचे समजले. पहिल्या पत्नीला मूलबाळ होत नसल्याने पहिल्या पत्नीने पतीसोबत दुसरे लग्न लावून दिल्याचे रीनाला समजले.

पीडित महिलेने केलेल्या आरोपावरून नवऱ्याच्या पहिल्या पत्नीचे पोलीस खात्यात तैनात असलेले नातेवाईक तिला धमकावत आहेत. मुलं जन्माला आल्यावर तुला 10 लाख रुपये देतो तसेच त्यानंतर अंकुरला घटस्फोट देऊन तू तुझे दुसरे लग्न करून घे अशी अट घातली आहे. मुलंच्या बदल्यात आम्ही तुला 10 लाख रुपये देऊ असेही सांगण्यात आले.

पीडितेच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अगोदरच विवाहित असताना फसवणूक करणे, लग्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com