भयंकर! भरधाव डंपरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्यांना उडवलं; ६ जणांचा जागीच मृत्यू

भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक दिली.
Uttar Pradesh Unnao Truck Accident
Uttar Pradesh Unnao Truck AccidentSaam TV

Uttar Pradesh Unnao Truck Accident : भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक दिली. या भयंकर घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नाव शहरात आज (रविवार) सायंकाळी घडली.

Uttar Pradesh Unnao Truck Accident
Akola News : भयंकर! नाल्याच्या काठावरील दगडाची भिंत कोसळली, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांसह (Police) स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. प्राप्त माहितीनुसार, उन्नाव शहरातील एका रस्त्याच्या कडेने काही लोक पायी जात होते.त्यावेळी भरधाव वेगात एक डंपर आला आणि त्याने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. (Latest Marathi News)

ही धडक (Accident) इतकी भीषण होती की, ट्रकने कारसह रस्त्यावरून पायी चालणाऱ्या लोकांना चिरडलं. या भयंकर घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार ते पाच लोक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर डंपरचालक हा घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, स्थानिकांनी त्याला पकडलं.

Uttar Pradesh Unnao Truck Accident
Pune Crime : नात्याला काळीमा! काकानेच केला दोन सख्ख्या पुतणींवर बलात्कार; पुण्यातील संतापजनक घटना

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. यावेळी पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनकडे जाणाच्या प्रयत्न केला. मात्र, अपघात पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकचालकासह काही पोलिसांना देखील चोप दिला.

पोलिसांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र लोक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान, संतप्त जमावाने दगडफेक सुरू केली. ट्रकचालकाला घेऊन जाणाऱ्या कॉन्स्टेबलला जमावाने बेदम मारहाण केली. अनेक पोलिस ठाण्यांच्या पोलिसांसह एसपी आणि एएसपी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लोकांना समज देऊन शांत केले. या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com