लग्न होऊन ७ महिने झाले, 'गुडन्यूज'साठी रजा द्या; पोलीस हवालदाराचा सुट्टीचा अर्ज व्हायरल

सोशल मीडियावर हे पत्र वेगाने व्हायरल होत आहे.
Police Constable leave Application
Police Constable leave ApplicationSaam TV

बलिया : सुट्टी मिळण्यासाठी काय पण...! असा विचार तुम्ही सुद्धा ही बातमी वाचल्यानंतर नक्कीच कराल. कारण, सुट्टी मिळावी यासाठी एका पोलीस हवालदाराने (Police Constable) आपल्या वरिष्ठांना एक अनोखं पत्र लिहलं आहे. लग्न होऊन ७ महिने झाले 'गुडन्यूज'साठी १५ दिवसांची रजा (Leave) पाहिजे अशा स्वरुपाचा मजकूर या पत्रात लिहण्यात आला आहे. दरम्यान, या अनोख्या पत्राची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर हे पत्र वेगाने व्हायरल होत आहे. (Police Constable Leave Application)

Police Constable leave Application
Aurangabad : 'भाजपमध्ये गेल्यावर ED ने कारवाई केल्याचं दाखवा अन् १० लाख जिंका'

सुनील कुमार यादव असं या पोलीस हवालदाराचं नाव असून ते उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यात कर्तव्यास आहेत. सुनील कुमार यांनी वरिष्ठांना लिहलेला हा अर्ज अतिशय मनोरंजक आणि अनोखा आहे. त्यांनी पत्रात लिहलं आहे की, 'सर, अर्जदाराच्या लग्नाला ७ महिने झाले आहेत, अद्याप कोणतीही गुडन्यूज मिळाली नाही'.

'डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेतले. त्यासाठी मी पत्नीसोबत घरीच राहणार आहे. त्यामुळे सरांना विनंती आहे की, कृपया माझा अर्ज मंजूर करावा आणि मला १५ दिवसांची ईएल (सुट्टी) द्यावी. विशेष बाब म्हणजे या अर्जात सुनील कुमार यांच्या पत्नीने देखील शिफारस केली आहे. सध्या या नवदाम्पत्याने केलेला हा अर्ज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Police Constable leave Application
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार; काय आहे प्रकरण?

रजेसाठी पोलीस कर्मचारी चिंतेत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस विभागातील इतरही अनेक जवान रजेच्या चिंतेत आहेत. राज्यात कोणत्याही ठिकाणी तणाव निर्माण झाला की सर्वप्रथम पोलिसांच्या सुट्या बंद केल्या जातात. विभागीय लोकांच्या म्हणण्यानुसार छोट्या-मोठ्या निवडणुकांव्यतिरिक्त होळी, दीपावली, दसरा, ईद, बकरीद, मोहरम आदी सणांना सुट्टी देण्याची प्रक्रिया बंद केली जाते. पोलिस किंवा इतर सरकारी विभागात महिलांसाठी प्रसूती रजा आणि पुरुषांसाठी पितृत्व रजेची तरतूद आहे.

महिलांची प्रसूती रजा वाढवली

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलीस विभागातील महिलांच्या प्रसुती रजेत वाढ करण्यात आली होती.सुरूवातीला महिला पोलिसांना १३५ दिवसांची प्रसूती रजा मिळत होती, काही वर्षांपूर्वी सरकारने ती वाढवून १८० दिवस केली आहे. महिलांप्रमाणेच पुरूष कर्मचाऱ्यांना सुद्धा पितृत्व रजेची तरतूद आहे. त्यांना १५ दिवसांची पितृत्व रजा दिली जाते. विभागीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही रजा संपूर्ण नोकरीदरम्यान दोनदाच घेता येते. कर्मचाऱ्याची पत्नी प्रसूती करणार असताना आणि तिला कोणत्याही आजाराने त्रस्त असतानाही ही रजा घेता येते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com