Mukhtar Ansari : 'बाहुबली' नेता मुख्तार अन्सारीला १० वर्षांची शिक्षा, काय आहे २६ वर्षांपूर्वीचं प्रकरण?

Mukhtar Ansari Latest Update : उत्तर प्रदेशातील बांदा तुरुंगात कैद असलेला बाहुबली नेता मुख्तार अन्सारी याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Mukhtar Ansari Latest News
Mukhtar Ansari Latest NewsSAAM TV

Mukhtar Ansari Latest Update : उत्तर प्रदेशातील बांदा तुरुंगात कैद असलेला बाहुबली नेता आणि माजी आमदार मुख्तार अन्सारी याला गँगस्टर अॅक्टशी संबंधित प्रकरणात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच अन्सारीला पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मुख्तार याच्याशिवाय भीम सिंह यालाही दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गाझीपूर कोर्टानं हा निकाल दिला. (Latest Marathi News)

यापूर्वी गुरुवारी गाझीपूर कोर्टानं मुख्तार अन्सारी आणि त्याचा साथीदार भीम सिंह याला दोषी ठरवलं होतं. शिक्षा सुनावली जात असतानाच भीम सिंह हा कोर्टात हजर झाला. तर मुख्तार अन्सारीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच युक्तिवाद पूर्ण झाला होता. (National News)

Mukhtar Ansari Latest News
Shraddha Walker Case : DNA रिपोर्टनंतर आफताबचं काय होणार? अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची महत्वाची प्रतिक्रिया

२६ वर्षांपूर्वीचं प्रकरण

१९९६ मध्ये दाखल केलेल्या प्रकरणात आज, २६ वर्षांनंतर मुख्तार अन्सारीला दोषी ठरवण्यात आलं. गँगस्टर अॅक्ट अंतर्गत एकूण पाच गुन्हे होते. त्यातील दोन गाझीपूर, दोन वाराणसी आणि एक चंदौली येथील होता. या प्रकरणात १२ डिसेंबरला ११ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी १५ डिसेंबरला म्हणजे आज फैसला सुनावण्यात येणार होता.

Mukhtar Ansari Latest News
Vande Bharat Train: नागपूरहून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, चार दिवसांपूर्वीच ट्रेन सेवा सुरु

४९ प्रकरणांत आहे आरोपी

मुख्तार अन्सारी जमिनींवर ताबा, हत्या, खंडणी वसुली आदींसह किमान ४९ गुन्ह्यांत तपास यंत्रणांच्या फेऱ्यात अडकला आहे. हत्येचा प्रयत्न आणि हत्या यांसह इतर प्रकरणांत उत्तर प्रदेशात त्याच्याविरोधात खटले सुरू आहेत. मुख्तार १९९६ मध्ये पहिल्यांदा बसपच्या तिकीटावर मऊ विधानसभा मतदारसंघातून निवडून आला होता. या विधानसभा मतदारसंघातून तो तीन वेळा निवडणूक जिंकला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com