प्रेमासाठी काही पण! प्रेयसीसोबत राहण्यासाठी मुलगी बनणार मुलगा

दोघींपैकी एका मुलीने डॉक्टरांशी संपर्क साधून सर्व माहिती घेतली.
Trending News
Trending NewsSaam Tv

उत्तर प्रदेश - खरे प्रेम कोणत्या थराला जाणार याचा काही नेम नसतो. अशीच एक घटना प्रयागराजमध्ये देखील घडली आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमधील एका मुलीने तिच्या प्रियसीसोबत राहण्यासाठी कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर तिचे चक्क लिंग बदलल्याचा निर्णय घेतला. दोन मुली प्रेमात पडल्या आणि त्यानंतर या दोघांनी एकत्र जीवन-मरणाची शपथही घेतली. परंतु जेव्हा कुटुंबाने त्यांचे नाते स्वीकारले नाही तेव्हा त्यांच्यापैकी एका मुलीने लिंग बदलल्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांना या दोघींच्या नात्याबाबाद कळताच त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. तरुणीने तिच्या कुटुंबियांचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न केले परंतु ते व्यर्थ ठरले आणि जेव्हा तिच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही तेव्हा तिने हा मोठा निर्णय घेतला.

हे देखील पाहा -

दोघींपैकी एका मुलीने डॉक्टरांशी संपर्क साधून सर्व माहिती घेतली. त्यानंतर प्रयागराजच्या राणी नेहरू रुग्णालयामध्ये ही सर्जरी करण्यात आली. प्रथम, तिच्या शरीराच्या वरच्या भागाची आणि छातीची पुनर्रचना करण्यासाठी तिच्या वरच्या शरीरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर नुकतीच तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया झाली ज्यामध्ये तिचे गर्भाशयही काढून टाकण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की शस्त्रक्रियेसाठी आणखी 1.5 वर्षे लागतील, त्यानंतर ती पूर्णपणे पुरुष होईल.

Trending News
सर्वात मोठी बातमी! पेट्रोल तब्बल 40 रुपयांनी स्वस्त होणार? GST परिषदेच्या बैठकीकडे लक्ष

१४ जून रोजी ही सर्जरी करण्यात आली. सध्या ती मुलगी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. तिला सुमारे ६ महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे लागणार आहे. दीड वर्षात ती पूर्णपणे बरी होईल आणि त्यानंतर ती लग्न करू शकेल अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. लिंग बदलण्याची ही राज्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी मेरठमधील एका मुलीने लिंग बदलल्याचा निर्णय घेतला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com