खोल दरीत कोसळली कार; एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू

Uttarakhand Car Accident
Uttarakhand Car AccidentANI

चमोली: उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमोली जिल्ह्यातील ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर (Rishikesh-Badrinath Highway) एक भयंकर घटना घडली आहे. भरधाव वेगानं येणारी कार 250 मीटर खोल दरीत (Car Accident) कोसळल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Police) आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहचली. एनडीआरफच्या टीमने खोल दरीत उतरून कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. दरम्यान, मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले पाचही व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते चमोली जिल्ह्यातील बाक गावचे रहिवासी असल्याचं समजतंय.

Uttarakhand Car Accident
भयंकर! रशियन सैन्याचा युक्रेनच्या शाळेवर बॉम्बहल्ला; ६० लोक दगावल्याची शक्यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते उत्तराखंडच्या बाच गावातील रहिवाशी होते. येत्या १२ मे रोजी मुलीचे लग्न असल्याने मेरठ येथून लग्नाची खरेदी करून ते कारने घरी परतत होते. दरम्यान, ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर तोताघाटीजवळ अचानक कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट 250 मीटर खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये प्रताप सिंग (वय ४०), भागीरथी देवी (वय ३६), पिंकी (वय २५), विजय (वय १५) आणि मंजू (वय १२) या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, कार 250 फुट दरीत असल्याने पोलिसांना अपघातग्रस्तांची मदत करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याचवेळी घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमचे पाचारण करण्यात आले. एनडीआरएफच्या अथक प्रयत्नानंतर कारमधून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेत श्रीनगरच्या रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकीचे (वय २५) येत्या १२ मे रोजी लग्न होणार होते. याच लग्नाची खरेदी करण्यासाठी हे कुटुंबिय मेरठ येथे खरेदीस गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com