एकतर नातवंडाचे तोंड दाखवा नाहीतर ५ कोटी द्या; मुलगा आणि सुनेविरोधात कोर्टात धाव

दाम्पत्याने आपल्या मुलाविरोधात हरिद्वारच्या जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. सुनावणी १७ मे रोजी होणार आहे.
एकतर नातवंडाचे तोंड दाखवा नाहीतर ५ कोटी द्या; मुलगा आणि सुनेविरोधात कोर्टात धाव
Haridwar NewsSaam Tv

हरिद्वार : आई-वडील आणि मुलांमध्ये संपत्तीच्या वादाच्या बातम्या आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतात, मात्र उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) एक अनोखी घटना समोर आली आहे. हरिद्वारमध्ये एका वृद्ध जोडप्याने आपल्या सून आणि मुलाकडे नातवंडांची मागणी केली आहे, जर ते हे करू शकत नसतील तर त्यांनी २.५ कोटी म्हणजेच एकूण ५ कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या दाम्पत्याने हरिद्वारच्या जिल्हा न्यायालयात (Court) दावा दाखल केला आहे. त्याची सुनावणी १७ मे रोजी होणार आहे. (Haridwar News)

दावा दाखल करणारे संजीव रंजन प्रसाद एकेकाळी अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते पत्नी साधना प्रसाद यांच्यासोबत एका हाऊसिंग सोसायटीत राहत आहेत. दोघांनी त्यांचा एकुलता एक मुलगा श्रेय सागरचा विवाह नोएडाच्या शुभांगी सिन्हासोबत २०१६ साली केला होता. श्रेय सागर हा पायलट आहे तर त्याची पत्नी नोएडा येथे काम करते, अशी माहिती प्रसादचे वकील अरविंद कुमार श्रीवास्तव यांनी दिली.

Haridwar News
पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर पीएमपीएल बसचे ब्रेक फेल; सात ते आठ गाड्यांना धडक

संजीव रंजन प्रसाद स्वतः सांगतात, 'मी माझे सर्व पैसे माझ्या मुलासाठी खर्च केले. त्याला अमेरिकेत प्रशिक्षण दिले. आता माझ्याकडे पैसे नाहीत. घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले. आम्‍ही आर्थिक दृष्‍टीने खूप त्रस्‍त झालो आहोत.

वयोवृद्ध पती-पत्नीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लग्नाला ६ वर्षे झाली. तरीही मुल जन्माला घालत नाहीत. त्यामुळे दोघांनाही खूप मानसिक छळ सहन करावा लागत आहे.

हरिद्वार न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत या वृद्ध जोडप्याने म्हटले आहे की, आमच्या मुलाला सक्षम बनवण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावले आहे. यानंतरही या वयात एकटेच जगावे लागत आहे. जे कोणत्याही यातनेपेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत त्यांनी आम्हाला एकतर नातू द्यावा नाहीतर, नाहीतर त्यांनी आम्हाला अडीच कोटी रुपये द्यावेत जे त्यांच्यावर खर्च झाले आहेत, असंही यात म्हटले आहे. (Haridwar News)

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.