Uttarakhand: पुष्कर सिंह धामी आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये (election) भाजपला चांगलेच यश मिळाले
Pushkar Singh Dhami
Pushkar Singh Dhami Saam Tv

वृत्तसंस्था: ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये (election) भाजपला चांगलेच यश मिळाले आहे. ५ पैकी ४ राज्यामध्ये भाजपला (BJP) बहुमत मिळाले आहे. यामध्ये मणिपूरमध्ये (Manipur) भाजपने सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, आज पुष्कर सिंह धामी हे दुसऱ्यांदा उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहणार आहेत.

हे देखील पहा-

पुष्कर सिंह धामी आज दुसऱ्यांदा उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री (CM) म्हणून शपथ घेणार आहेत. डेहराडून येथील परेड ग्राउंडवर शपथविधी सोहळा होणार आहे. पुष्कर सिंह धामी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये धामी यांचा पराभव झाला होता. तरीदेखील भाजपन त्यांना परत एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. उत्तराखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा भाजप सरकार परत एकदा सत्तेत येत आहे. यामुळे या विक्रमी विजयाला भव्यदिव्य करण्यासाठी परेड ग्राऊंड सज्ज करण्यात आले आहे.

Pushkar Singh Dhami
TMC नेत्याच्या हत्येमुळे हिंसाचारावर केंद्राने मागवला ममता सरकारकडून अहवाल

या शपथविधीच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव सहभागी होणार आहेत. याबरोबरच शहरातील संत, प्रज्ञावंत, सर्वसामान्यांबरोरबच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, आजच्या या सोहळ्याकरिता आमदार, मंत्री आणि व्हीआयपींना बसण्यासाठी ३ स्वतंत्र व्यासपीठ उभा करण्यात आले आहेत. हेलिपॅड देखील तयार करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १ हजार पोलीस परेड ग्राऊंडमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. येथे २५ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com