कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचा भीषण अपघात; १३ डबे एकमेकांवर आदळले

Train Major Accident : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील भरथाना रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी (३० एप्रिल) मालगाडीचा भीषण अपघात झाला.
Train Major Accident
Train Major AccidentSaam Tv

इटावा: उत्तर प्रदेशातील इटावा (Etawah Uttar Pradesh) जिल्ह्यातील भरथाना (Bharthana) रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी (३० एप्रिल) मालगाडीचा भीषण अपघात (Train Accident) झाला. या अपघातात मालगाडीचे अनेक डबे रुळावरून घसरल्याची माहिती आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFCC) वर हा अपघात झाला आहे. अपघातानंतर पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मालगाडीला अखेर अपघात कसा झाला? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे समजते.

Train Major Accident
'मोदी हैं, तो मुमकिन हैं'; वीज संकटावरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा 'जोर का झटका'

मिळालेल्या माहितीनुसार, ही मालगाडी कोळसा भरून कानपूरहून दिल्लीच्या (Kanpur To Delhi) दिशेने जात होती. भरथना रेल्वे स्थानक क्रॉस केल्यानंतर इकदिल स्थानकाच्या दोन किलोमीटर अलिकडे डीएसपी रेल्वे रुळावरून मालगाडीचे डबे घसरले. हा अपघात इतका भीषण होता की, रेल्वेचे १३ डबे एकमेकांवर आदळले. या मालगाडीला एकूण ५८ डबे होते. यातील ३१ डबे हे इंजिनसह पुढे १ किमी अंतरावर गेले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांसह रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारीही तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दिल्ली, आग्रा, तुंडला आणि झाशी येथूनही अपघात निवारण गाड्या तातडीने रवाना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अपघातामुळे दिल्ली आणि हावडा दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, डब्यांमध्ये भरलेला कोळसा चक्काचूर झाला असून रुळांचेही नुकसान झाले आहे. आज संध्याकाळपर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. या घटनेनंतर अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना कडाक्याच्या उन्हात त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे रेल्वेचे डबे रुळावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com