Uttrakhand Monsoon: अतिवृष्टीमुळे डेहरादून-ऋषिकेश पर्यायी पूल कोसळला

पर्यायी रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा नेपाळी फार्म मार्गे देहरादूनला वळविण्यात आली आहे.
Uttrakhand Monsoon: अतिवृष्टीमुळे डेहरादून-ऋषिकेश पर्यायी पूल कोसळला
Uttrakhand Monsoon: अतिवृष्टीमुळे डेहरादून-ऋषिकेश पर्यायी पूल कोसळला

उत्तराखंडमध्ये(Uttrakhand) संततधार पावसामुळे राणीपोखरीतील(Ranipokhari) जाखन नदीवर (Jakhan River) बांधलेला पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. यामुळे ऋषिकेश (Rushikesh) आणि डोईवाला दरम्यानची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. पर्यायी रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा नेपाळी फार्म मार्गे डेहरादूनला वळविण्यात आली आहे. तर दुसरीकडे, डोंगराळ भागात पावसामुळे राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते भूस्खलनामुळे बंद झाले आहेत.

हवामान खात्याने पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. रस्ता बंद झाल्याने प्रवासी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. नोडल एजन्सीकडून बंद रस्ते उघडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परंतु हवामानामुळे विभागाला अडचणी येत आहेत. दरम्यान, डेहरादून-ऋषिकेश रस्त्यावरील राणीपोखरी पूल मुसळधार पावसामुळे तुटला. या अपघातात पुलावरून जाणारी अनेक वाहने नदीत कोसळली.

आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पूल कोसळताना दोन लोडर आणि एका कारसह तीन वाहने नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एका जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालायात पाठविण्यात आले आहे. पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले. राणीपोखरी पूल कोसळ्यामुळे डेहराडून ते ऋषिकेश हा मुख्य रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

उत्तराखंड हवामान विभागाने राज्यात 8 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या मते, ८ सप्टेंबरनंतर पावसाच्या स्थितीत कोणताही बदलाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी देहरादून, टिहरी, पौडी, नैनीताल, चंपावत, बागेश्वर आणि पिथौरागढ जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com