Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणातील याचिकांवर 7 जुलैला सुनावणी होणार, वाराणसी कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

संबंधित सर्व प्रकरणावरील ७ याचिकांवर 7 जुलैला एकत्रितपणे सुनावणी होणार आहे.
Gyanvapi Masjid Case
Gyanvapi Masjid CaseSaam Tv

Gyanvapi Case News: ज्ञानव्यापी मशीदीच्या आवारात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने (ASI) सर्व्हे करण्याचा आग्रह करत वाराणसी जिल्हा कोर्टात मुस्लिम पक्षातर्फे सोमवारी निषेध याचिका दाखल केली आहे. या संबंधित सर्व प्रकरणावरील ७ याचिकांवर 7 जुलैला एकत्रितपणे सुनावणी होणार आहे.

दरम्यान, ज्ञानव्यापी मशीद समितीने कोर्टात म्हटलं आहे की, 'औरंगाजेब क्रूर नव्हता किंवा मुघल देखील क्रूर नव्हते. त्याचबरोबर वाराणसीत त्याने विश्वेश्वर मंदिराची तोडफोड केली नव्हती'. (Latest Marathi News)

परिसरात केलेल्या एएसआई सर्व्हेक्षणावर निषेध याचिकेत मशीद समितीने हिंदू पक्षाने केलेल्या दाव्याचे खंडन केलं आहे. हिंदू पक्षाने विश्वेश्वर मंदिर आक्रमक मुस्लिम शासकांनी नष्ट केल्याचा दावा केला होता. या संबंधित सर्व ७ याचिकांवर येत्या ७ जुलै सुनावणी होणार आहे.

Gyanvapi Masjid Case
Breaking News: वसुली एजंटकडून जबरदस्तीने वाहने जप्त करणे बेकायदा; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

मशीद समितीने गेल्या वर्षी कोर्टात ज्ञानव्यापी मशिदीत कोणत्याही प्रकारचं शिवलिंग सापडलं नसल्याचं म्हटलं आहे. ही वास्तू एका कारंज्यासारखी आहे. तसेच मुस्लिम शासकांनी आक्रमण केल्याच्या हिंदू पक्षाच्या दाव्यावर देखील आक्षेप मशीद समितीने घेतला आहे. तर दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी हे वक्तव्य केल्याचा आरोप समितीने केला आहे.

Gyanvapi Masjid Case
Sengol History: नव्या संसद भवनातलं सेंगोल काय आहे? हजारो वर्ष जुन्या प्रतिकाचं चोळ साम्राज्याशी आहे कनेक्शन, जाणून घ्या

सात याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

दरम्यान, मुस्लिम समितीने पुढे म्हटलं की, ' ज्ञानव्यापी मशीद हजारो वर्षांपासून आहे. ज्ञानव्यापी मशीद ही आजही आहे, उद्याही असणार आहे. वाराणसी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात मुस्लिम समुदाय कोणत्याही अडचणीशिवाय नमाज पठण करत होता'.

याच दरम्यान, वाराणसी कोर्टात ७ जुलै रोजी ज्ञानव्यापी प्रकरणावरील ७ याचिकेवर जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून एकत्रित सुनावणी देण्याचे आदेश दिले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com