Varanasi : टॅटू काढणे तरुणांना पडले महागात; १२ जणांना झाली HIV ची लागण; कारण ?

तरुण-तरुणी वेगवेगळे डिझाइन्स आणि आकारांचे टॅटू बनवतात. मात्र, असे टॅटू काढणेच १२ जणांना चांगलेच महागात पडले आहे. टॅटू काढल्याने वाराणसीतील १२ जणांना HIV ची लागण झाली आहे.
file photo
file photo saam tv

वाराणसी : तरुण-तरुणींमध्ये सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आजकाल टॅटू काढण्याची क्रेझ वाढली आहे. सदर क्रेझ ही तरुणांमध्ये अधिक प्रमाणांमध्ये दिसून येते. तरुण-तरुणी वेगवेगळे डिझाइन्स आणि आकारांचे टॅटू (Tattoo) बनवतात. मात्र, असे टॅटू काढणेच १२ जणांना चांगलेच महागात पडले आहे. टॅटू काढल्याने वाराणसीतील १२ जणांना HIV ची लागण झाली आहे. (Varanasi News In Marathi)

file photo
ISRO SSLV Launch: ७ ऑगस्टला अंतराळात तिरंगा फडकणार; ७५० विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह इसरो पूर्ण करणार स्वप्न

टॅटू काढल्यानंतर १२ जणांना HIVची लागण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाराणीसीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एचआयव्ही झालेल्या व्यक्तीमध्ये १० मुलं आणि २ मुलींचा सामावेश आहे. एचआयव्ही बाधित व्यक्तीला टॅटू काढताना वापरलेली सुई इतरांना वापरल्याने १२ जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. सध्या तरुण-तरुणींमध्ये टॅटू काढण्याचे प्रमाण वाढत आहे. टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणारी साधनं निर्जंतुक न केल्यामुळे १२ जणांना HIV ची लागण झाल्याचे बोलले जात आहे.

file photo
आई म्हणावं का राक्षसीण? डॉक्टर महिलेने पोटच्या ४ वर्षीय मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकलं

दरम्यान, वाराणसीच्या सदर घटनेवर एका डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉक्टरांनी सांगितले की,' एचआयव्ही (HIV) हा विषाणू आहे. तो हवेच्या संपर्कात आला, तर लगेच नष्ट होतो. एखाद्या व्यक्तीला टॅटू काढल्यानंतर वापरलेली सुई लगेच दुसऱ्या व्यक्तींना वापरली जात नाही.वापरली तरी हा विषाणू हवेच्या संपर्कात आल्यावर नष्ट होतो. त्यामुळे टॅटूच्या माध्यमातून HIVची लागण होण्याची शक्यता फार कमी आहे. जवळपास नाही, अशा पद्धतीत आहे'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com