Vice President Election 2022 : ऑगस्ट महिन्यात हाेणार उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक

राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुक 22 जुलैला हाेणार आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.
vice president election, 6 august 2022,
vice president election, 6 august 2022,saam tv

नवी दिल्ली : देशाच्या (India) उपराष्ट्रपती (Vice President) पदाची निवडणुक (Election) सहा ऑगस्ट राेजी हाेणार आहे. याबाबतची घाेषणा आज (बुधवार) निवडणुक आयाेगाने (Election Commission) केली. येत्या पाच जूलैला निवडणुकीबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. (Vice President Election Latest Marathi News)

सध्या उपराष्ट्रपती कार्यरत असलेले व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाल दहा ऑगस्टला संपत आहे. त्यापुर्वी या पदासाठी निवडणूक घेणे आवश्यक असल्याने आज (बुधवार) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तारखेची घाेषणा करण्यात आली.

vice president election, 6 august 2022,
Wimbledon 2022 : सेरेना विल्यम्स पहिल्याच फेरीत गारद; नदालची आगेकूच

उपराष्ट्रपती पदाची निवडणूकीचा कार्यक्रम

पाच जूलै : निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी हाेणार.

19 जूलै : उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख.

20 जूलै : अर्जांची छाननी.

22 जूलै : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख.

सहा ऑगस्ट : आवश्यक असल्यास मतदान.

सकाळी दहा ते संध्याकाळी पाच

सहा ऑगस्ट : मोजणी.

Edited By : Siddharth Latkar

vice president election, 6 august 2022,
ठाकरे सरकार वाचविण्यासाठी मलिक, देशमुखांची धडपड; सर्वाेच्च न्यायालयात धाव
vice president election, 6 august 2022,
Ashadhi Wari 2022 : आराेग्य विभागाची वारकऱ्यांना संजीवनी; साडेचार हजारांवर उपचार
vice president election, 6 august 2022,
आठवड्यानंतर शासकीय कर्मचारी होणार मालामाल; माेदी सरकार घेणार माेठा निर्णय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com