M Venkaiah Naidu Covid Positve: उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना काेराेनाची लागण

भारत हा अमेरिकेनंतर कोरोना व्हायरसने सर्वाधिक प्रभावित झालेला जगातील दुसरा देश आहे.
m venkaiah naidu
m venkaiah naidusaam tv

दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू (m venkaiah naidu) यांचा रविवारी काेविड १९ चा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. याबाबतची माहिती नायडू यांनी ट्विट करुन दिली आहे. काेराेना संसर्गाची लागण झाली असून एका आठवड्यासाठी सेल्फ-आयसोलेशनमध्ये जाणार असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी संपकार्तील निकवर्तीयांना स्वतःची चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. (vice president m venkaiah naidu tests covid positive goes into selfisolation sml80)

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे हैदराबादमध्ये (hyderabad) आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांना शनिवारी नेताजींना पुष्पांजली अर्पण केली होती. आज त्यांना काेराेनाची (corona) लागण झाल्याचे त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

m venkaiah naidu
पीव्ही सिंधूने पटकाविले Syed Modi International Badminton चे अजिंक्यपद; मालविका बनसाेड उपविजेती

दरम्यान, भारतात गेल्या २४ तासांत ३,३३,५३३ नवीन कोविड-१९ (covid19) रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारच्या तुलनेत संख्या किंचित कमी आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज नमूद केले. देशात ५२५ मृत्यूंसह मृतांची संख्या 4,89,409 वर पोहोचली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1.6 अब्जाहून अधिक लसींचे डोसही देण्यात आले आहेत. हे 5,42,321 बूस्टर किंवा 'सावधगिरी' डोससह गेल्या 24 तासांत 71,10,445 लसीचे डोस प्रशासित करते.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com