Vice Presidential Election 2022 : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मतदान

देशाच्या नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी आज संसद भवनात मतदानाला सुरुवात झाली आहे.
Vice Presidential Election 2022
Vice Presidential Election 2022Saam Tv

नवी दिल्ली : देशाच्या नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी आज संसद भवनात मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जगदीप धनखर आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर मार्गारेट अल्वा यांच्या तुलनेत पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखर यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत मतदान केले आहे. तसेच विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपल्यानंतर एक दिवस ११ ऑगस्ट रोजी पुढील उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील.

Vice Presidential Election 2022
Petrol Diesel: गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करताय? मग आधी पेट्रोल-डिझेलचे दर तपासा

जगदीप धनखर यांची भारताच्या पुढील उपराष्ट्रपतीपदी निवड झाली, तर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष एकाच राज्याचे असतील, हा योगायोग असणार आहे. सध्या ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष देखील असतात.

Vice Presidential Election 2022
PM Modi -Mamata Banerjee | ममता बॅनर्जींनी घेतली PM मोदींची भेट, विरोधक म्हणाले...

व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे, आणि नवीन उपराष्ट्रपती ११ ऑगस्ट रोजी शपथ घेतील. दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्यही उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असतात. संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची सध्याची संख्या ७८८ आहे, त्यापैकी भाजपकडे ३९४ खासदार आहेत. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला ३९० पेक्षा जास्त मतांची आवश्यकता असते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com