Video: समुद्रात आढळणारी दुर्मिळ प्रजातीचा ब्लू लॉबस्टर; किंमत ऐकून व्हाल हैराण

सोशल मीडियावर या दुर्मिळ प्रजातीच्या ब्लू लॉबस्टरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral News
Viral NewsSaam Tv

Viral Video: समुद्राच्या आत असलेले जग अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यांनी भरलेले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये, सागरी माशांव्यतिरिक्त, विविध समुद्री जीवांची मागणी पूर्वीपेक्षा अधिक वाढत आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात समुद्रात मासेमारी करताना दिसत आहेत. मासेमारी करीत असताना कधी कधी काही अनोखे समुद्री जीव देखील मच्छिमारांना सापडतात.

नुकताच सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये समुद्रातून मासे पकडताना एका माणसाला दुर्मिळ प्रजातीचा ब्लू लॉबस्टर दिसला. ज्याला नंतर त्या व्यक्तीने पुन्हा समुद्रात सोडले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral News
Viral Video: म्हशीने तरुणीसोबत केलं असं काही; हसून हसून लोटपोट व्हाल!

व्हायरल होत असलेली ही क्लिप अमेरिकन मच्छीमार Blake Haass ने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये या माणसाच्या हातात दुर्मिळ ब्लू लॉबस्टर दिसत आहे. यासोबतच ही लॉबस्टरची दुर्मिळ प्रजाती असल्याचेही सांगितले जात आहे.

हा दुर्मिळ ब्लू लॉबस्टरची बाजारात किंमत सुमारे 500 डॉलर्सपेक्षा जास्त आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती त्या लॉबस्टरला परत समुद्रात सोडताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर समुद्रात लॉबस्टर परत सोडल्याबद्दल सर्वजण त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com