Viral News :'बॉयफ्रेंडने ब्रेकअप केलं...'; रडत रडत मुलीने केला थेट पोलिसांना फोन, त्यांनी दिलेले उत्तर होतंय व्हायरल

६ वर्षांपासून रिलेशनमध्ये जोडपं वेगळे झाल्यामुळे मुलीला जबर धक्का बसला. त्यामुळे तिने थेट पोलिसांना घडलेलेला प्रकार सांगितला.
Viral News
Viral NewsSaam Tv

Viral News : एका मुलीचं बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं. त्यामुळे भडकलेल्या मुलीने रागा-रागात पोलिसांनाच कॉल केला. ६ वर्षांपासून रिलेशनमध्ये जोडपं वेगळे झाल्यामुळे मुलीला जबर धक्का बसला. त्यामुळे तिने थेट पोलिसांना घडललेला प्रकार सांगितला. ही घटना चीनी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

दक्षिण चीनच्या मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या झेजियांग प्रांतातील ही घटना आहे. ब्रेकअप झालेल्या मुलीने थेट पोलिसांना फोन लावला. सहा वर्षांपासून सुरू असलेलं नातं तोडून बॉयफ्रेंड सोडून गेला आहे. त्याला कृपया त्याला शोधून काढा'.

बॉयफ्रेंडची तक्रार देताच पोलिसांनी मुलीला उलट प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्यानंतर मुलगी रडत रडत पोलिसांना सांगू लागली की, मला आता काहीच समजत नाहीए. तो माझ्यासोबत असा का वागला, मला सर्वच जाणून घ्यायचं आहे'.

Viral News
Viral News : अजबच ! चक्क YouTube ची मदत घेऊन तिने केली शेती, तब्बल 5 लाखांहून अधिक नफा

पोलीस अधिकाऱ्यांचं उत्तर होतंय व्हायरल

मुलीची तक्रारी समजून घेतल्यानंतर पोलीस अधिकारी म्हणाले, 'तुम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. तुम्हाला त्याच्याशी पुन्हा नातं जोडायचं असेल तर, तुम्हाला नात्यातील दुराव्याचं मूळ समजून घेतलं पाहिजे. तुम्ही त्याला तुमचा गैरफायदा घेण्याची संधी देऊ नका. तुम्ही असा विचार करा की, तुम्ही खूप भाग्यवान आहात. 'योग्य व्यक्ती' तुमची वाट पाहत आहे'.

Viral News
Viral Video News: मृत्यूने सलूनमध्ये गाठलं! भरधाव कार दुकानात शिरली अन् २ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं

पोलीस अधिकाऱ्यांनी फोनवर पुढे म्हणाले, 'बॉयफ्रेंडचा (Boyfriend) मोबाईल क्रमांक ब्लॉक करा. त्याच्यासोबतचे संबंध तोडून टाका. मन शांत ठेवा. एकटं एकटं राहू नका. वाईट विचार करू नका. मित्र-मैत्रिणींना जाऊन भेटा'.

दरम्यान, चीनी सोशल मीडियावर पोलीस आणि मुलीचं संभाषण प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. हे संभाषण १ कोटींहून अधिक लोकांनी ऐकले आहे. मुलीची प्रेमाने समजूत घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com