
Viral Answer Sheet: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट प्रकाशझोतात येईल सांगता येत नाही. फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा प्लॅटफॉर्मवर अनेकदा मजेशीर, तर काही वेळा विचार करायला लावणाऱ्या गोष्टी व्हायरल होतात. अनेकदा विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर लिहिलेल्या मजेशीर कमेंट व्हायरल झालेल्या तुम्ही पाहिल्या असतील परंतु सध्या एका पाचवीतील मुलाची विचार करायला लावणारी उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे.
'मी समाजसुधारक असतो तर देशातील अशी कोणती सामाजिक प्रथा थांबवली असती जी समाजालाच्या प्रगतीत अडथळा ठरते' असा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाला 5वीतील विद्यार्थ्याने दिलेले कौतुकास्पद उत्तर सध्या व्हायरल होत आहे.
विद्यार्थ्याच्या वडिलांनी शेअर केला फोटो
महेश्वर पेरी नावाच्या युजरने हा उत्तरपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या पाच वर्षांच्या मुलाने पाचवीच्या परीक्षेत एका प्रश्नाच्या उत्तरात हे सर्व लिहिले आहे. यामध्ये बालकाला स्वातंत्र्यपूर्व काळातील वाईट समाजिक प्रथांविषयी प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही त्या काळात जन्माला आला असता तर भारताला मागास होन्यापासून रोखण्यााठी प्रचलित असलेली कोणती सामाजिक कुप्रथा संपवली असती असा प्रश्न विचारण्यात आला होता. (Viral News)
विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत नेमकं काय लिहिलं?
पाचवीतील मुलाने दिलेले उत्तर त्याची समाजाविषयीची भावना आणि दृष्टिकोण याची कल्पना येते. मुलाने उत्तरपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात लिहिले की 'मला विधवा पुनर्विवाह कायदा आणायला आवडेल. जर स्त्री विधवा झाली तर ती सती जाते, पांढरी साडी नेसते आणि केस बांधून बाहेर जाऊ शकत नाही. जर या विधवां पुनर्विवाह करू शकल्या असत्या, तर तर त्यांचे आयुष्य अधिक चांगले असू शकले असते'. विद्यार्थ्यांने लिहिलेल्या या उत्तराची सर्वत्र कौतुक होत आहे.
यूजर्सकडून मुलावर कौतुकाचा वर्षाव
पाचवीच्या मुलाने लिहिलेले हे उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यूजर्स यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, या मुलाची बुद्धिमत्ता इतक्या लहान वयात एवढी आहे, कधी कधी मोठे लोकही इतके बुद्धिमान नसतात. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, हा मुलगा खूप दयाळू दिसतो, त्याने अप्रतिम उत्तर लिहिले आहे. या मुलाच्या वडीलांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.