
Latest Viral News in Marathi : राजस्थानमधून (Rajasthan ) एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केलं आहे. या लग्नाची आता सर्वत्र चर्चा होत असून या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे हे लग्न चारचौघात नाही तर मोठ्या थाटामाटात पार पाडलं. मात्र या तरुणाने दोन सख्ख्या बहिणींशी लग्न का केलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यामागचं खरं कारण जाणून तुम्ही भावुक व्हाल.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना राजस्थानमधील मोरझाळा गावातील आहे. येथे राहणाऱ्या नवरदेव हरिओमने सांगितले की, कुटुंबीय त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधत होते. त्यामुळे तो सिद्दा गावातील रहिवासी बाबूलाल मीणा यांची मोठी मुलगी कांता हिच्याशी त्याच्या लग्नाबद्दल चर्चा सुरु होती. (Latest Marathi News)
ज्यावेळी हरिओम बाबूलाल मीणा यांच्या घरी मुलगी पाहणीच्या कार्यक्रमाला गेला, त्यावेळी नवरी मुलगी कांताने त्याच्या समोर एक अट ठेवली. कांताने त्याला सांगितलं की, तीच तिच्या धाकट्या बहिणीवर खूप प्रेम आहे. ती मानसिकदृष्ट्या गतिमंद आहे. ती त्याच व्यक्तीशी लग्न करेल जो त्या दोन्ही बहिणींशी लग्न करेल.
कांताची ही अट ऐकून हरिओम म्हणाला की, नवरी मुलीची ही अट ऐकून तो आणि त्याचे कुटुंबीय थक्क झाले. पण धाकट्या बहिणीला सुमनला आयुष्यभर सांभाळायचे आहे, असे कांताने सांगितल्यावर दोन्ही बहिणींचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर मुलाच्या घरच्यांनी या लग्नाला संमती दिली. (Viral News)
हरिओमच्या कुटुंबीयांनी ५ मे रोजी मोठ्या थाटामाटात हा आगळावेगळा विवाह सोहळा आयोजित केला होता. वधू म्हणून दोन्ही बहिणींनी एकाच मांडवात एकाच मुलाशी एकत्र सप्तपदी घेतली. सासरच्या घरी आल्यावर हरिओमची पत्नी झालेल्या दोन्ही नवविवाहित जोडप्यांना पूर्ण विधी करून घरात प्रवेश करण्यात आला.
हरिओमने सांगितले की, तो स्वत: स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. तर त्यांची पत्नी कांता उर्दूमधून बीएड आहे. कांताची धाकटी बहीण म्हणजेच हरिओमची दुसरी पत्नी सुमन मानसिकदृष्ट्या गतिमंद असल्यामुळे ती केवळ ८ वीपर्यंतच शिकू शकली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.