
Woman Got Married With Son's Friend: लग्न ही आयुष्यातील अतिशय महत्त्वाची घटना असते. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला चांगला जोडीदार मिळावा यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु अशात समोर आलेली एक बातमी तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकते. सध्याच्या काळात लग्नासंदर्भात लोक अतिशय प्रॅक्टिकल झाले आहेत. असेच एक प्रकरण सध्या चर्चेत आहे.
अमेरिकेतील एका महिलेने तिच्या मुलाच्या मित्राशी लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. या महिलेचा मुलगा आणि त्याचा मित्र एकमेकांना भेटायला घरी येत-जात असताना या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि पुढे त्यांनी लग्न केले. विशेष म्हणजे या दोघांच्या वयात खूप अंतर आहे.
महिलेने शेअर केले पार्टनरसोबचे फोटो
अमेरिकेतील ओहायो येथील हे संपूर्ण प्रकरण आहे. येथे राहणाऱ्या तान्या नावाच्या महिलेने तिच्या मुलाच्या मित्राशी लग्न केले आहे. द सनच्या वृत्तानुसार, अलीकडेच महिलेने सोशल मीडियावर ही संपूर्ण गोष्ट सांगितली. यासोबतच महिलेने स्वतःचे आणि तिच्या पार्टनरचे काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Viral News)
आधी प्रेम झालं आणि नंतर लग्न केलं
या महिलेचं वय 42 वर्षे आहे. सर्वप्रथम महिलेचं मुलाच्या मित्रावर प्रेम जडलं आणि त्यानतंर सुमारे तीन वर्षं ते रिलेशनशिपमध्ये राहिले. या महिलेने ज्या मुलासोबत लग्न केले त्याचे नाव जोसू असून तो २४ वर्षांचा आहे. तान्या आणि जोसू 2018 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले. (Latest Marathi News)
रिपोर्ट्सनुसार तान्याला 12 आणि 14 वर्षांचे दोन मुलं आहेत आणि ते दोघे जोसूला भेटायला जात होते आणि तोही त्या महिलेच्या मुलांना भेटायला घरी यायचा. याच काळात महिला आणि जोसू यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
महिला, मुलं आणि पती गुण्यागोविंदाने राहतात
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला अनेक दिवसांपासून पतीपासून वेगळी राहत होती. लोकांना जेव्हा तिच्या मुलांच्या मित्रासोबत सुरु असलेल्या अफेअरबद्दल कळालं तेव्हा तिच्यावर भरपूर टीका झाली. परंतु आता दोघांनी लग्न केले आहे.
दोघेही त्यांचे रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या महिलेचा पती आता त्याच्या दोन मुलांची व्यवस्थित काळजी घेतो आणि सर्वजण मित्र म्हणून राहतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.