
Viral News: आई होणं हा बहुतेक स्त्रियांसाठी जीवनातील एक मोठा प्रसंग असतो. स्त्रीने बाळाला जन्म देणे हा तिच्यासाठी सर्वात कठीण आणि आनंदाचा क्षण असतो. सामान्यत: महिलांच्या गर्भधारणेचे चक्र 9 महिन्यांचे असते. परंतु काही प्रकरणात विशेष परिस्थिती असेल तर सातव्या किंवा आठव्या महिन्यातच मूल जन्माला येतं.
परंतु अमेरिकेत एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. ही केस पाहून तुम्ही आम्ही काय डॉक्टरही हैराण झाले आहेत. येथे एक महिला सुमारे 9 वर्षे गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. परंतु नऊ वर्षांनंतर या महिलेच्या पोटातून बाळाऐवजी एक कठीण दगड बाहेर आला आहे. या प्रकारामुळे डॉक्टरही आश्चर्य व्यक्त करत आहे.
नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्टनुसार ही घटना अमेरिकेतील काँगोची आहे. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार एक अमेरिकन महिला सुमारे 9 वर्षांपर्यंत गर्भवती होती आणि त्यानंतर तिच्या पोटातून दगड बाहेर आला. अशा घटनांना वैद्यकीय भाषेत लिथोपेडियन म्हटले जाते. यामध्ये बाळापर्यंत रक्त पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही आणि गर्भधारणेदरम्यान त्याची वाढ थांबते. या प्रकरणातील अमेरिकन महिलेच्या बाबतीतही असेच घडले. (Latest Marathi News)
डॉक्टरांनी केला खुलासा
डॉक्टरांनी सांगितले की या महिलेच्या गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात बाळाची हालचाल होत नव्हती. त्यामुळे आपल्या मुलाचा गर्भपात झाला आहे असे तिला वाटले. परंतु डॉक्टरांनी सांगितले की तिचा गर्भपात झाला नव्हता, तर महिलेच्या पोटात असलेले मूल जिवंत नव्हते. यानंतर डॉक्टरांनी अनेक औषधे लिहून दिली आणि महिलेला तपासणीसाठी परत बोलावले. परंतु घरी पोहोचल्यावर लोकांनी तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर ती शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात गेलीच नाही आणि 9 वर्षे मृत बाळ गर्भात राहिले.
बाळच ठरलं मृत्यूचं कारण
मृत बाळ पोटात असल्याने महिलेने काहीही अन्न खाल्ले तरी तिला ते पचत नव्हते. त्यामुळे हळूहळू ती कुपोषणाची बळी ठरत गेली आणि नंतर कुपोषणामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली तेव्हा त्यांना महिलेच्या पोटातील मृत बाळ पूर्णपणे दगडासारखे कठीण झाल्याचे आठळले. महिलेच्या पोटात असलेला गर्भ दगड बनल्यानंतर आतड्यांमध्ये अडकला होता आणि हेच तिच्या मृत्यूचं कारण ठरलं. (Viral News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.