Viral Video: भयंकर! तरुणांमध्ये रस्त्यावर जुंपली, भलामोठा दगडच घातला डोक्यात; धक्कादायक VIDEO व्हायरल, नेटकरी संतापले

Fighting On Road: हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत...
Bikers Fighting Viral Video
Bikers Fighting Viral VideoSaamtv

Bikers Fighting On Road: सोशल मीडियावर भांडणाचे, मारामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. हे व्हायरल व्हिडिओ पाहताना कधी राग अनावर होतो, तर कधी भितीने गाळणही उडते. आत्तापर्यंत रस्त्यावर किरकोळ भांडणाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलं, मात्र सध्या सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे जो पाहून तुम्हीही हादरुन जाल..

Bikers Fighting Viral Video
Pune News: भवानी पेठेत 2015 पासून पाकिस्तानी तरुणाचे बेकायदेशीर वास्तव्य, पोलिसांनी घेतले ताब्यात, बनावट पारपत्र जप्त

रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा चुकून दुसऱ्याला धक्का लागला तरी वाद निर्माण होतात. अनेकदा या किरकोळ कारणाचे रुपांतर मोठ्या भांडणातही होते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही अशाच एका भांडणाचा आहे, मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत असे भांडण जीवावरही बेतू शकते, अशा शब्दात खडेबोल सुणावले आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण छोट्याशा कारणावरुन भर रस्त्यामध्ये वाद घालत असल्याचे दिसत आहे. या दोघांचा हा वाद बघता बघता वाढत जातो आणि उभा असलेला तरुण थेट भलामोठा दगड उचलत गाडीवर बसलेल्या तरुणाच्या डोक्यात घालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Bikers Fighting Viral Video
Ajit Pawar News: ..हा तर निर्लजपणाचा कळस; भर विधानसभेत अजितदादा संतापले; फडणवीसांकडून दिलगिरी, नेमकं काय घडलं?

तरुणाने मारलेला हा दगड सरळ दुसऱ्या तरुणाच्या चेहऱ्यावर जोरात लागतो. सुदैवाने गाडीवरील तरुणाने हेल्मेट घातले असल्याने त्याला कोणतीही गंभीर जखम होत नाही. मात्र हे भांडण पाहणाऱ्यांनाही या संपूर्ण प्रकाराने धक्का बसतो. पण जर या गाडीवरील तरुणाने हेल्मेट घातले नसते तर मात्र हा हल्ला त्याच्या जिवावरचं बेतला असता असे हा व्हिडिओ पाहताना दिसत आहे.

या रस्त्यावरील हाय होल्टेज ड्राम्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांंनी दगड मारणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे, तर दुसरीकडे काही जणांनी हेल्मेट असल्यामुळे जीव वाचला, असे म्हणत हेल्मेट वापरण्याचा सल्लाही दिला आहे. (Latest Marathi News Update)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com