Viral Video: पक्षाने तिकीट नाकारले.. माजी उपमुख्यमंत्री भावूक, कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले; व्हिडिओ व्हायरल

Thatikonda Rajaiah Viral Video: माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा यांचे तिकीट नाकारल्यानंतर ते कार्यकर्त्यांसमोरच रडू लागले
Thatikonda Rajaiah Viral Video
Thatikonda Rajaiah Viral VideoSaamtv

Telangana News: तेलंगणामध्ये सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी एकूण ११९ जागांसाठी ११५ उमेदवारांची नावे जाहीर केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा यांचे तिकीट नाकारल्यानंतर ते कार्यकर्त्यांसमोरच रडू लागले. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Thatikonda Rajaiah Viral Video
Chhatrapati Sambhajinagar: तब्बल १७६ वर्षाची ऐतिहासिक परंपरा! गंगागिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहाची गिनीज बुकात नोंद

याबाबत अधिक माहिती अशी की, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी एकूण ११९ जागांसाठी ११५ उमेदवारांची नावे जाहीर केली. स्वत: के. चंद्रशेखर राव गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवरून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी त्यांनी तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि घानपूर (स्टेशन) मतदारसंघाचे विद्यमान आमदार थातिकोंडा राजैया यांना उमेदवारी नाकारली.

तसेच त्यांच्या जागी यागी जेष्ठ नेते कडियाम श्रीहरी यांना उमेदवारी दिली. घानापूर मतदारसंघातून भारत राष्ट्र समितीने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर थातिकोंडा राजैया चांगलेच भावूक झाले. यावेळी कार्यकर्त्यांसमोरच ते ढसाढसा रडू लागले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे.

दरम्यान, उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार राजैया हे आंबेडकर पुतळा केंद्रात पोहोचले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी “जय राजैया, जय तेलंगणा” अशा घोषणाही दिल्या. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी थातिकोंडा राजैया यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या एका सरपंचाने राजैया यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या कारणामुळेच त्यांना उमेदवारी नाकारल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com