
Viral News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ शहराची तेथील लोकांच्या संस्कृतीमुळे देशात एक वेगळी ओळख आहे. याच लखनऊ शहरातील नागरिकांची प्रतिमा डागाळणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियसी धावत्या स्कुटीवर प्रियकराच्या मांडीवर रोमान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)
प्रेमी जोडप्याने लखनऊच्या (Lucknow) रस्त्यावर सर्वच हद्द पार केल्या आहेत. या दोघांनी ट्रॅफिकच्या नियमांचंही उल्लंघन केलं आहे. प्रेमी जोडप्यांनी कोणालाही लाजवेल असं कृत्य केलं आहे. हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी दोघांवर चांगलेच संतापले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत की, धावत्या स्कुटीवर प्रियसी ही प्रियकराच्या मांडीवर बसली आहे. प्रियसी ही प्रियकराला घट्ट बिलगून बसली आहे. त्याचबरोबर प्रियसी अधून-मधून प्रियकराला चुंबन घेताना दिसत आहे.
दोघांचा रोमान्स पाहून रस्त्याने आजूबाजूला असणाऱ्या वाहन चालकांच्या नजरा त्यांच्याकडेच लागलेल्या दिसत आहे . सोशल मीडियावर प्रेमी जोडप्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या जोडप्यावर चांगलेच संतापले आहेत.
मुलगी अल्पवयीन, मुलाला पोलिसांनी केली अटक
दरम्यान, प्रेमी जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लखनऊ सेंट्रल झोनचे डीसीपी अपर्णा रजत कौशिक तातडीने चौकशी आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी स्कुटी चालवणाऱ्या प्रियकराला अटक केली.
अल्पवयीन प्रियसीची ओळख पटली आहे. पोलिसांनी २९४, २७९ कलमांतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी मुलीची माहिती दिली नाही. तसेच पोलिसांनी प्रियकराची स्कुटी जप्त केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.