Viral Video: वा... क्या बात! मुलासोबत रोमँटिक फोटो काढण्यासाठी सासूने केली सुनेची मदत, सुंदर व्हिडिओ पाहाच

Perfect Family Video : या व्हिडिओत सासू-सुनेचं नातं पाहून तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याशिवाय राहणार नाही.
Perfect Family Video
Perfect Family Videosaam tv

Trending Video: सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेशीर असतात, काही मनोरंजक असतात, तर काही हसवणारे आणि विचार करायला लावणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सासू-सुनेचं नातं पाहून तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका वृद्ध जोडप्याचा त्यांच्या मुलासोबत आणि सुनेसोबतच आहे. या व्हिडिओ हे वृद्ध दाम्पत्य आपल्या सूनेला मुलासोबत परफेक्ट रोमँटिक फोटो काढण्यासाठी मदत करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सासू-सुनेची बॉन्डिंग पाहून तुमच्या तोंडातून वा! क्या बात! असे उद्गार बाहेर पडल्याशिवायर राहणार नाही.

Perfect Family Video
Sheena Bora Case : देशातील सर्वात धक्कादायक मर्डर मिस्ट्रीवर बनणार वेब सीरीज, हत्याकांडाचं रहस्य उलगडणार?

तुम्ही पाहू शकता हा व्हायरल व्हिडिओ समुद्रकिनाऱ्यावरचा आहे. या ठिकाणी एक तरुण जोडपे एका छोट्या खडकावर चढताना आणि स्वतःचा रोमँटिक फोटो काढताना दिसत आहे. तर शेजारी मुलाचे आई आणि वडील त्यांना परफेक्ट फोटो मिळावा यासाठी मेहनत घेताना दिसत आहे.

या फोटोत तरुणीचा सासरा फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, तर सासू सुनेला चांगला फोटो मिळावा यासाठी तिची मदत करताना दिसत आहे. हे संपूर्ण दृश्य तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. (Viral Video)

Perfect Family Video
Dapoli Resort : दापोली रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना दिलासा, 28 मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश

अभिनेता भूषण प्रधानने पोस्ट केला व्हिडिओ

इस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपे आपल्या मुलाला सूनेला रोमँटिक फोटो काढण्यासाठी कशी मदत करत आहे हे तुम्ही पाहिले आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ अभिनेता भूषण प्रधान याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (Viral News)

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने "या सासू-सासऱ्यांना त्यांच्या सुनेला समुद्रकिनाऱ्यावर परफेक्ट फोटो काढण्यात मदत करताना पाहून आश्चर्य वाटले!" असे कॅप्शन दिले आहे. इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि यावर मोठ्या संख्येने यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com