VIP कल्चर नाकारणाऱ्या नितीन गडकरींचा साधेपणा; पहा Video

नवनीत मिश्रा यांनी आपल्या ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.
VIP कल्चर नाकारणाऱ्या नितीन गडकरींचा साधेपणा; पहा Video
VIP कल्चर नाकारणाऱ्या नितीन गडकरींचा साधेपणा; पहा VideoSaam Tv

नितीन गडकरी Nitin Gadkari आपल्या एकदा भाषणात म्हणाले होते की, मंत्रिपद किंवा आमदारपद हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते, एकदा गाडीवरचा लाल दिवा गेला की, परत त्याला कोणी विचारात नाही. माणूस सामान्य होतो. याच सामान्यतेचे दर्शन ते वेळोवेळी देत असतात. असाच एक साधेपणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवनीत मिश्रा यांनी आपल्या ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. यात व्हिडिओमध्ये नितीन गडकरी सामान्य माणसाप्रमाणे विमानात प्रवेश करण्याच्या रांगेत जाताना दिसून येत आहेत.

मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम नेते म्हणून नितीन गडकरी यांचा उल्लेख केला जातो. विरोधी पक्षातील सोनिया गांधी यांनी स्वतः देखील संसदेत नीतीन गडकरी यांचे कौतुक केलं होत.

तसेच हॉर्नचा उद्देश पूर्ण व्हावा मात्र कुणालाही या आवाजाचा कर्णकर्कश हॉर्नचा त्रास होऊ नये, यासाठी एक अनोखी कल्पना नितीन गडकरी यांनी मंत्रालयाला सुचवली आहे. त्यानुसार तबला, तनपुरा, बासरी, पेटी यासारख्या भारतीय वाद्यांचा वापर करून नव्या प्रकारचे हॉर्न तयार करण्यावर विचार सुरू आहे. हे हॉर्न काही वर्षांनी बाजारात दाखल होतील आणि मग रस्त्याने जाताना संगीत कानावर पडत राहिल, असे देखील नितीन गडकरी म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.