Viral News: अरे बापरे! जमिनीतून २०० फूट उडाला पाण्याचा फवारा; थांबता थांबेना!

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही काही चमत्कार पाहत आहात.
Viral News
Viral NewsSaam Tv

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो. नुकताच सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही काही चमत्कार पाहत आहात.

व्हिडीओत काय आहे?

या व्हिडिओमध्ये जमिनीतून पाणी बाहेर येत आहे. या पाण्याचे प्रेशर इतके आहे की पाण्याचे फवारे जवळपास २०० फूट उंच उडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी पूर्णपणे हैराण झाले आहेत. अचानक जमिनीतून पाणी बाहेर पडत असल्याचं पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

हा व्हिडीओ नेमका खरा आहे की तो बनवलेला गेला याची पुष्टी साम टीव्ही करत नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर त्याच दाव्याने शेअर केला जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये खडकांमधून पाणी बाहेर येत असल्याचे दिसत आहे. या पाण्याला इतकं प्रेशर कुठून आलं? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ बघून नेटकरी पूर्णपणे हैराण झालेत. या व्हिडीओला नेटकरी शेअर करताना दिसत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ nakkas.gumus.el.sanatlari नामक इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 1 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे.

Viral News
Marathwada Liberation Day: मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम

व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही व्हायरल होत आहेत. एका यूजरने कमेंट करताना हा चमत्कार असल्याचे लिहिले आहे. दुसरीकडे, आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, असे दृश्य यापूर्वी कधीही पाहिले नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com