
Uttar Pradesh Tractor Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला असंख्य व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. ज्यामधील काही व्हिडिओ पोट धरुन हसायला लावतात तर कधी आश्चर्यचकित करणारे असतात. ज्यामध्ये असंख्य व्हिडिओ हे गाड्यांच्या स्टंटचे, ड्रायव्हरच्या जबरदस्त कौशल्याचेही असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्याही डोळ्यावर विश्वास बसणार आहे.
हा व्हायरल व्हिडिओ एका ट्रॅक्टरचा असून बिना ड्रायव्हरचा हा ट्रॅक्टर चालू होऊन एका दुकानात शिरल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागची कथा, चला जाणून घेवू.. (Viral Video)
सोशल मीडियावर आपण सुसाट धावणाऱ्या गाड्यांचे, त्यांच्या स्टंटचे व्हायरल व्हिडिओ नेहमीच पाहत असतो. पण या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांनाही गोंधळात टाकले आहे. याचे कारण म्हणजे व्हिडिओमध्ये एक ट्रॅक्टर ड्रायव्हरविना चालू झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ युपीमधील (Uttar Pradesh) बिजनौर शहरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
दुकानासमोर उभा असलेला ट्रॅक्टर आपोआप समोरच्या चप्पलच्या दुकानात शिरल्याचे दिसत आहे, ज्यामध्ये दुकानाचेही मोठे नुकसान झाले आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या व्हायरल व्हिडिओने सर्वांनाच गोंधळात टाकले आहे. ( tractor staring on its own and breaking glass doars of shop)
समोर आलेल्या माहितीनुसार., किशन कुमार नावाची एक व्यक्ती आपला ट्रॅक्टर एका चप्पलच्या दुकानासमोर लावून निघून जातो. एक तासभर तो ट्रॅक्टर त्याच ठिकाणी उभा असतो. मात्र तासाभराने ट्रॅक्टर आपोआप सुरू होतो. आणि दुकानाची काच तोडून थेट आतमध्ये शिरतो. काही वेळाने आसपासच्या लोकांनी धाव घेत ट्रॅक्टर बंद करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
मात्र हा ट्रॅक्टर बिना चालकाचा चालू कसा झाला, हाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. शेखर नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला असून त्याने हा भुताटकीचा प्रकार असल्याचे आपल्या कॅप्शनमध्ये म्हणले आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केले आहे..
कंपनीकडून देण्यात आले उत्तर.......
हा ट्रॅक्टर मेस्सी फरग्युसन कंपनीचा असून या घटनेसंबंधित बोलताना कंपनीने अशा प्रकारे मानवी हस्तक्षेपाशिवाय ट्रॅक्टर सुरूच होऊ शकत नाही, असे उत्तर दिले आहे. तसेच संबंधित ट्रॅक्टर मालक हा आमचा अनेक वर्षापासूनचा ग्राहक असून आत्तापर्यंत कोणतीही तक्रार आली नाही, असेही कंपनीने सांगितले आहे. तरीही याबाबतची चौकशी करण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.