Viral Video : काय बोलायचं आता! सापाने हाताला दंश करत केलं रक्तबंबाळ; तरुण मात्र व्हिडिओच्या धुंदीत, पुढे काय घडलं?

Snake Bite Viral Video : सापाचा दंश झाल्यावर एक व्यक्ची त्यावर उपचार करण्याऐवजी साप कसा चावला याचा व्हिडिओ शूट करत आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

Snake Bite : सापाचं नाव ऐकताच साऱ्यांना पळता भुई थोडी होते. साप चावल्यानंतर झटपट त्यावर प्रथमोपचार केला जातो. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून संताप व्यक्त कारावा की काळजी असा प्रश्न तुमच्या मनात येईल. सापाचा दंश झाल्यावर एक तरुण त्यावर उपचार करण्याऐवजी साप कसा चावला याचा व्हिडिओ शूट करत आहे. (Snake Viral Video)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती साप पकडण्यासाठी जंगलात आला आहे. साप दिसताच स्नेक स्टीकने तो सापाला पकडतो. यावेळी सापाची शेपटी एका हातात पकडून दुसऱ्या हाताने तो स्टीकच्या सहाय्याने सापाचे तोंड कपडण्याच्या प्रयत्नात असतो. तितक्यात साप उलटा फिरतो आणि भयंकर घटना घडते.

Viral Video
Gautami Sister : कसली भारी दिसते राव...; गौतमी की तिची बहिण?

साप उलटा फिरून थेट त्या तरुणाच्या हाताला दंश करतो. दंश करुन साप लगेच जात नाही तर आपल्या दातांनी तरुणाच्या हाताला कडाडून चावा घेतो. त्यामुळे या तरुणाच्या हातातून रक्त येऊ लागते. रक्त आल्यामुळे किंवा साप आपला हात सोडत नाही त्यामुळे हा तरुण लगेचच सापाला बाजूला काढत नाही. असा प्रसंग इतर व्यक्तींबरोबर घडला तर काय करावे हे तो या व्हिडिओमधून सांगत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सापाने कडाडून चावा घेतल्यावर हा तरुण सांगतो की, साप हात सोडत नसल्यास त्याला धरून मागे खेचू नका. त्याऐवजी सापाच्या तोंडाजवळ काही वेळ दाबून धरा. हा तरुण देखील तसेच करतो. त्यानंतर साप त्याचा वरचा जबडा उघडतो आणि नंतर खालचा जबडा उघडून तरुण स्वत:ची सुटका करुन घेतो.

Viral Video
Constipation : पोटात सारखा गॅस, पोट होत नाही साफ, हे खा आणि २ मिनीटात मोकळे व्हा

सापाच्या दंशाने या तरुणाचा हात रक्तबंबाळ झाल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. @RajeshIndori या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळालेत तर ६.३ मिलीअनहून जास्त व्यक्तींनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com