VIRAL VIDEO : ही तर हद्दच झाली; डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत जोडप्याने काढले टॅटू; जीभेवरही...

या दोघांनी त्यांच्या संपूर्ण शरीरावर टॅटू काढून स्वत:चं रुप बदलंल आहे.
VIRAL VIDEO
VIRAL VIDEOSaam TV

VIRAL VIDEO : लठ्ठ व्यक्ती बॉडी ट्रांसफॉर्मेशनने अनेकांना चकीत करतात. अनेक अभिनेत्रींचे थक्क करणारे ट्रांसफॉर्मेशन तुम्ही आजवर पाहिले असतील. अशात सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून यातील व्यक्ती पृथ्वीवर राहणारे आहेत की, नरकात राहणारे असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. व्हिडिओमध्ये एका जोडप्याने भयानक बॉडी ट्रांसफॉर्मेशन केलं आहे. यात त्यांनी शरीरावर सगळीकडे टॅटू काढले आहेत. (Latest Marathi News)

अर्जेंटिना येथे गॅब्रिएला पेराल्टा आणि व्हिक्टर ह्यूगो पेराल्टा हे जोडपं राहतं. या दोघांनी त्यांच्या संपूर्ण शरीरावर टॅटू काढून स्वत:चं रुप बदलंल आहे. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत या दोघांनी एकून ९८ वेळा त्यांच्या शरीरात बदल केले आहेत. आपले शरीर अशा विचित्र पध्दतीने बदलायचे हा त्या दोघांचा निर्णय होता.

VIRAL VIDEO
Viral Video : अबब ! केस कापण्यासाठी डोक्यावर बर्फाची लादी ठेवून सलूनमध्ये पोहोचला, पुढे जे घडलं...

आज संपूर्ण जगातील सर्वाधीक टॅटू (Tattoo) असलेले ते प्रथम जोडपे आहे. त्यामुळे गिनीज वर्ल्ड रोकॉर्डमध्येही त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. तसेच गिनीज वर्ल्ड रोकॉर्डने नुकताच या जोडप्याचा (Couple) एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून सर्वचजण थक्क झाले आहेत.

VIRAL VIDEO
Leopard Viral Video: कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; २ नागरिकांसह ३ जनावरांवर हल्ला

अशी झाली दोघांची भेट

गिनीज वर्ल्ड रोकॉर्डने गॅब्रिएला आणि व्हिक्टर या दोघांच्या भेटीचा किस्सा देखील सांगितला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही २४ वर्षांपासून एकत्र आहेत. ब्यूनस आयर्समधील एका मोटरसायकल इवेंटमध्ये त्यांची भेट झाली. दोघांचेही स्वप्न एकच होते. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र डोळ्यात साठवलेले स्वप्न सत्यात साकारण्यासाठी त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या.

डोळ्यातही टॅटू

या जोडप्याने अगदी डोळ्यावर देखील टॅटू काढले आहेत. अनेक मुली नाक आणि कानात विविध दागिने घालण्यासाठी टोचून घेतात. काही मुलं देखील आजकाल असं करतात. मात्र गॅब्रिएला आणि व्हिक्टर या दोघांनी या बाबतीत देखील कहर केला आहे. त्यांनी शरीरात एकूण ५० ठिकाणी छिद्रे केली आहेत. यात १४ बॉडी इम्प्लांट, ४ नाकतले, २ कानातले, ८ मायक्रोडर्मल आणि इतकेच नाही तर या दोघांनी जिभ देखील टोचून घेतली आहे.

नकराचे देवदूत म्हणून प्रसिध्द

या जोडप्याने त्यांच्या शरीरावर इतके बदल केल्याने ते सामान्य व्यक्ती प्रमाणे दिसत नाहीत. अनेक जण त्यांना अचानक पाहिल्यावर घाबरून रडू लागतात. त्यांच्या विचित्र लूकमुळे त्यांचे नाव नरकाचे देवदूत असेही पडले आहे. मात्र कोणी काही म्हटले तरी त्याची त्यांना काहीच पर्वा नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच टॅटू ही एक कला आहे. त्यामुळे तिचा आनंद घेलता पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com