
Vodafone Company: जगावर सध्या आर्थिक मंदीचे (Economic Recession) सावट आहे. या मंदीचा फटका जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक कंपनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेत आहे. अशामध्ये आता जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम (Telecom) कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोन कंपनीने (Vodafone Layoff 2023) 11000 कर्मचार्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कंपनीच्या सीईओ मार्गेरिटा डेला व्हॅले यांनी सांगितले की, कंपनीमध्ये कठोर बदलांची गरज आहे. पहिल्या तिमाहीच्या आकडेवारीनंतर कंपनीने ही घोषणा केली आहे.' तसंच, 'कंपनीची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. अशा परिस्थितीत कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज भासू लागली आहे. सध्या जगभरात 1,04,000 कर्मचारी काम करत आहेत. कंपनीकडून कर्मचाऱ्यांची प्रक्रिया 3 वर्षांत पूर्ण करण्याची योजना आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.
व्होडाफोन कंपनीने कर्मचारी कपातीचा हा निर्णय अशावेळी घेतला आहे जेव्हा कंपनीची कमाई 1.3 टक्के म्हणजेच 14.7 अब्ज युरोवर राहिली आहे. जी मुळात 15-15.5 अब्जपेक्षा कमी आहे. कंपनीने सांगितले की, 'कमाईत घट हे जर्मनीतील उच्च ऊर्जा खर्च आणि व्यावसायिक कमी कामगिरीमुळे झाले आहे. पुढील वर्षी उत्पन्नात आणखी घट अपेक्षित आहे. जी 13.3 अब्ज युरोपर्यंत खाली येऊ शकते.'
व्होडाफोन समूह भारतासह अनेक देशांमध्ये व्यवसाय करतो. या कंपनीत सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त लोकं काम करतात. 11,000 कर्मचाऱ्यांची कपात ही या कंपनीची आतापर्यंतची सर्वात मोठी कपात आहे. व्होडाफोनने अलीकडेच त्याच्या अनेक प्रमुख मार्केटमध्ये कर्मचारी कपात केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला इटलीमध्ये 1000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते. याशिवाय एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, कंपनी जर्मनीमध्ये सुमारे 1300 लोकांची कपात करण्याची योजना आखत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.