Manipur Election 2022: मणिपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यात २२ जागांसाठी मतदान सुरु...

Manipur Assembly Election 2022: मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी मतदान सुरू झाले असून 92 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.
Manipur Election 2022: Voting for 22 seats in Manipur begins in the second phase ...
Manipur Election 2022: Voting for 22 seats in Manipur begins in the second phase ...Saam Tv

इंफाळ: मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या (Manipur Assembly Election 2022) दुसऱ्या टप्प्यात आज सहा जिल्ह्यांतील 22 जागांसाठी मतदान होत आहे. आज होणाऱ्या मतदानासाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या ३०० हून अधिक कंपन्या थौबल, जिरिबाम, चंदेल, उखरुल, सेनापती आणि तामेंगलाँग जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत. थौबल खोऱ्यात येते, तर इतर पाच जिल्हे आसाम आणि नागालँडच्या सीमेवर म्यानमारच्या पर्वतीय प्रदेशात आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य सीमेवर सुरक्षा दलाकडून सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. (Voting for 22 seats in Manipur begins in the second phase ab95)

हे देखील पहा -

92 उमेदवारांचे भवितव्य पणाला:

मणिपूर (Manipur) विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1,247 मतदान केंद्रांवर 4,28,968 महिलांसह 8,47,400 मतदार 92 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. आजचे मतदान तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले (2002-2017) काँग्रेसचे ओकराम इबोबी सिंह तसेच भाजपचे अनेक मंत्री आणि विद्यमान आमदारांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. एक 74 वर्षीय ओकराम इबोबी सिंह हे थौबल जिल्ह्यातील थौबल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तसेच भाजपचे लितांथेम बसंता सिंग, जनता दल-युनायटेडचे ​​इरोम चाओबा सिंग आणि शिवसेनेचे कॉन्सुम मायकल सिंग याच्यात लढत होणार आहे.

मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क:

मणिपूरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओकराम इबोबी सिंग यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तांत्रिक त्रुटींमुळे मतदान केंद्रावर थोड्या विलंबानंतर त्यांनी मतदान केले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com