Weather Alert : 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या पुढील ३ दिवस हवामान कसे असेल

मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Rain Alert
Rain AlertSaam TV

नवी दिल्ली - सध्या दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पुढील ३ दिवस काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू आणि केरळच्या किनारी भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय कर्नाटक, रायलसीमा, कोस्टल आंध्र प्रदेश, लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Rain Alert
Petrol Diesel Price : वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेट्रोल- डिझेलचे नवीन दर जाहीर

हवामान खात्यानुसार, दक्षिण आंध्र प्रदेश-तामिळनाडू-पुडुचेरी, लक्षद्वीप आणि कोमोरिन भागात 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. याशिवाय पुढील 24 तास लक्षद्वीप, मालदीव-कोमोरिन परिसर आणि केरळच्या काही भागात जोरदार वारे वाहू शकतात. पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा धोका लक्षात घेता, हवामान खात्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, श्रीलंकन ​​किनारपट्टी, मन्नारचे आखात आणि लगतच्या कोमोरिन परिसर तसेच नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागातील मच्छिमारांना समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला दिला आहे.

डोंगरावर बर्फवृष्टीसह पावसाची शक्यता

हवामान खात्याने ताज्या अपडेटमध्ये सांगितले आहे की, येत्या 48 तासांत जम्मू-काश्मीर , लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे या राज्यांमध्ये तापमानात घट होणार असून थंडी आणखी वाढू शकते.

16 नोव्हेंबर रोजी, आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि अंदमान समुद्रालगतच्या भागात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. त्याच वेळी, वायव्य भारतातील काही भागांमध्ये तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com