दानिश सिद्दिकींच्या मृत्यूबद्दल आम्हाला खेद; पण आम्ही जबाबदार नाही - तालिबान

रॉयटर्स इंडिया या वृत्तसंस्थेचे मुख्य छायाचित्रकार दानिश सिद्दिकींचा तालिबानच्या हल्ल्यात शुक्रवारी मृत्यृ झाला होता. याबद्दल तालिबानने खेद व्यक्त केला आहे.
दानिश सिद्दिकींच्या मृत्यूबद्दल आम्हाला खेद; पण आम्ही जबाबदार नाही - तालिबान
दानिश सिद्दिकींच्या मृत्यूबद्दल आम्हाला खेद; पण आम्ही जबाबदार नाही - तालिबानSaam Tv News

रॉयटर्स इंडिया या वृत्तसंस्थेचे मुख्य छायाचित्रकार दानिश सिद्दिकींचा तालिबानच्या हल्ल्यात शुक्रवारी मृत्यृ झाला होता. याबद्दल तालिबानने खेद व्यक्त केला आहे. दानिश सिद्दिकींच्या मृत्यृबाबत आम्हाला खेद आहे, मात्र यासाठी आम्ही जबाबदार नाही असं तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद सीएनएन न्यूज १८ शी बोलताना म्हटलंय. We regret the death of Danish Siddiqui; But we are not responsible said the Taliban

हे देखील पहा -

अफगाणिस्तानामधील हिंसेचे war of afganistan वृत्तांकन करताना दानिश सिद्दिकी यांचा मृत्यू झाला होता. मात्र तालिबानी बंडखोरांनी talibani terrorist दानिश यांची हत्या केल्याचं सांगितलं जातय. यावर तालिबानने आपला या हत्येशी काहीच संबंध नसल्याचं म्हटलंय. सोबतच दानिश यांच्या मृत्यूबद्दल तालिबानने शोकही व्यक्त केलाय. दानिश यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसकडेinternational committee of red cross सोपवण्यात आले.

दानिश सिद्दिकींच्या मृत्यूबद्दल आम्हाला खेद; पण आम्ही जबाबदार नाही - तालिबान
पुढील 100 ते 125 दिवस फार महत्वाचे; मोदींचा इशारा

कोण होते दानिश सिद्दिकी?

40 वर्षीय दानिश सिद्दिकी हे ‘रॉयटर्स इंडिया’ reuters india या वृत्तसंस्थेचे मुख्य छायाचित्रकार होते. अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये Kandahar, afganistan तालिबानी बंडखोर talibani terrorist आणि अफगाण सैन्यात afghan soldiers सुरू असलेल्या युद्धाचे ते छायाचित्रण करत होते. त्यांनी अलीगढच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून Jamia Millia Islamia या विषयात पदवी घेतली होती. सुरवातीला त्यांनी दूरचित्रवाणी पत्रकार म्हणून काम केलं. नंतर ते छायाचित्र पत्रकारितेकडे वळले. 2010 साली ते रॉयटर्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. दानिश सिद्दिकी आणि त्यांचे सहकारी अदनान अबिदी यांना 2018 मध्ये रोहिंग्या निर्वासितांच्या पेचप्रसंगाच्या छायाचित्रणासाठी पुलित्झर Pulitzer Prize पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सिद्दिकी यांनी 2020 मधील दिल्ली दंगल, कोरोना विषाणू साथ, 2015 चा नेपाळमधील भूकंप, 2016 - 2017 चा मोसुलमधील संघर्ष, हाँगकाँगमधील दंगली यांचे छायाचित्रांकन केले होते. त्यांची छायाचित्रे जगभरात प्रसिद्ध झाली होती.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com