Congress Rally: "आम्हाला राहुल गांधी हेच अध्यक्ष हवेत"; कॉंग्रेसच्या महारॅलीत झळकले पोस्टर्स

Congress Halla Bol Rally: राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीच्या रामलीला मैदानावर महागाई विरोधात हल्ला बोल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
We Want Rahul Gandhi As A President
We Want Rahul Gandhi As A Presidentशिवाजी काळे

शिवाजी काळे

नवी दिल्ली : येत्या १७ ऑक्टोबरला कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणुक (Congress President Election) होणार आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचच लक्षं लागलं आहे. अशात "आम्हाला राहुल गांधी अध्यक्ष हवेत" असे पोस्टर कॉंग्रेसच्या महारॅलीत झळकले आहेत. देशातील वाढत्या महागाई विरोधात राजधानी दिल्ली येथे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात दिल्लीच्या रामलीला मैदानावर महागाई विरोधात हल्ला बोल रॅलीचं (Mehngai par halla bol rally) आयोजन करण्यात आलं आहे, यावेळी राहुल गांधीच्या समर्थनार्थ हे पोस्टळ झळकले आहेत. (Rahul Gandhi Latest News)

हे देखील पाहा -

कॉंग्रेसच्या या महारॅलीत राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावं यासाठी एक पोस्टर झळकवण्यात येत आहे. येत्या १९ ऑक्टोबरला कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. कॉंग्रेसचे अनेक नेते राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचं अध्यक्ष पद स्वीकारावं म्हणून आग्रह धरत आहेत. मात्र, राहुल गांधी यांनी आपण अध्यक्ष होणार नाही असं वारंवार सांगितलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाची कमान आली होती.

कॉंग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) हेच पक्षाचे अध्यक्ष व्हावेत असा आग्रह केला आहे. मात्र, अनेक नेत्यांचा राहुल गांधींच्या नावाला विरोधही आहे. काही दिवसांपुर्वीच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली होती, यावेळी त्यांनी सोनिया गांधींना दिलेल्या पत्रात राहुल गांधीवर निशाणादेखील साधला होता. त्यामुळे अशा वातावरणात कॉंग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. (Congress President Election News)

अशी असेल कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणुक

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना २२ सप्टेंबरला जारी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ही निवडणूक १७ ऑक्टोबर रोजी होणार असून त्याचे निकाल १९ ऑक्टोबर रोजी जाहीर होतील, असे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी CWC बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

We Want Rahul Gandhi As A President
चीन आणि तैवानमध्ये पुन्हा वाढला तणाव, लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैवानच्या सागरी हद्दीत

राहुल गांधींनी नकार दिल्यास हे पर्याय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान न झाल्यास, पक्षातील अन्य नेत्यांच्या गळ्यात अध्यदपदाची माळ देखील पडू शकते. त्या अनुषंगाने देखील चर्चा सुरू आहे. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष न झाल्यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत देखील पक्षाचे अध्यक्ष होऊ शकतात, अशी माहिती काँग्रेसशी संबंध असलेल्या सूत्रांनी दिली आहे. तसेच गहलोत यांच्या व्यतिरिक्त पक्षातील मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, कुमारी शैलजा आणि अन्य काही नावांचा देखील विचार करण्यात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com