
Weather Update : सध्या देशाच्या विविध भागात थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतातून कोरडे वारे वाहत असल्यानं अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. दुसरीकडे भारतातही थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना, दुसरीकडे श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Latest Marathi News)
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, आज आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर आणि तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवरील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस (Rain Alert) पडू शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांवरील काही ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागात हलका पाऊस (Weather Alert) पडण्याची शक्यता आहे.
पुढील २४ तासांत वायव्य आणि मध्य भारतात रात्रीचे तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाची स्थिती दुसऱ्या दिवशीही अशीच राहणार आहे. त्याचवेळी, कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
दिल्लीसह उत्तर प्रदेश तसेच अनेक राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये गुलाबी थंडी सुरू झाली आहे. बर्फवृष्टीमुळे डोंगराळ भागात थंडी वाढली आहे. दरम्यान 21 आणि 22 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीतील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येत्या काही दिवसांत कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा इशारा
आज डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तराखंडमध्ये हलका पाऊस पडू शकतो. तसेच हिमाचल प्रदेशच्या काही भागात देखील पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.