Weather Update: सावधान! आज दिल्लीसह अनेक राज्यात पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट जारी!

कडक उन्हाचा सामना करणाऱ्या दिल्लीकरांना दिलासा
Weather Update
Weather UpdateSaam tv

नवी दिल्ली - देशभरात मान्सूनचा हंगाम जवळपास संपला आहे. मात्र तरीही राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पाऊस सुरूच आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान खात्याने (IMD) हवामानाबाबत काही अलर्ट जारी केले आहेत. हवामान खात्याने बुधवारी गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. म्हणजेच आज या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची दाट शक्यता आहे.

हे देखील पाहा -

दिल्ली NCR मध्ये आज पाऊस पडेल का?

त्याचवेळी कडक उन्हाचा सामना करणाऱ्या दिल्लीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. IMD ने आज हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहू शकतो. राजधान दिल्लीत दिवसभर आकाश ढगाळ राहील आणि काही भागात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather Update
Petrol Diesel: पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या आजचा भाव

येत्या काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज काय आहे?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये आज आणि उद्या, येत्या 2 दिवसांत उत्तर प्रदेशात काही ठिकाणी, तर कोकण आणि गोवा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये येत्या 3 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या ५ दिवसांत उत्तराखंडमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय दक्षिण भारतातील अनेक भागात पावसाची शक्यता IMD ने व्यक्त केली आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आज विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com