Weather Update: यूपी-बिहार-दिल्लीसह 'या' राज्यांत पावसाचा अलर्ट जारी

हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. आज सकाळी अनेक राज्यांमध्ये हलका पाऊस पाहायला मिळाला आहे.
Weather Update: यूपी-बिहार-दिल्लीसह 'या' राज्यांत पावसाचा अलर्ट जारी
Weather Update: यूपी-बिहार-दिल्लीसह 'या' राज्यांत पावसाचा अलर्ट जारीSaam Tv

हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. आज सकाळी अनेक राज्यांमध्ये हलका पाऊस पाहायला मिळाला आहे. अनेक राज्यांत हलका ते मध्यम पाऊस स्वरुपाचा पाऊस झाला. हवामान विभागाने हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, यूपी, बिहार, पंजाब आणि राजस्थानमध्ये आज काही ठिकाणी हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसाठी अतिवृष्टीचा इशाराही जारी केला आहे.

मध्य प्रदेशातील 19 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी

हवामान विभागाने शुक्रवारी मध्य प्रदेशातील 19 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या भोपाळ कार्यालयाचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ पी के साहा यांनी सांगितले की, जबलपूर, सेहोर, देवास, शाजापूर, आगर माळवा, नीमच, मंदसौर, रतलाम, अलीराजपूर, झाबुआ, राजगढ, गुणा, शेओपूर, अनुपपूर, बालाघाट, सिवनी, धार, शिवपुरी या जिल्ह्यांत अलर्ट देण्यात आला आहे. मोरेना जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे.

Weather Update: यूपी-बिहार-दिल्लीसह 'या' राज्यांत पावसाचा अलर्ट जारी
इस्त्रायली आणि भारतीय तंत्रज्ञानाने सुसज्ज 36 वे राफेल जानेवारीत येणार

ते म्हणाले की, भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, चंबळ आणि जबलपूरसह राज्यातील दहा विभागांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. साहा म्हणाले की, टीकमगढमधून मान्सून ट्रफ जात आहे. याशिवाय पूर्व राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, ज्यामुळे मध्य प्रदेशात ओलावा आला आहे. पुढील 24 तासांमध्ये मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. साहा म्हणाले की, 14 सप्टेंबरपर्यंत मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे.

दिल्ली-एनसीआरला यलो अलर्ट

राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात आज मुसळधार पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभागाने दिल्ली आणि एनसीआरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की दिल्ली एनसीआरच्या अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. दिल्लीत संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

यूपी-बिहारमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल

हवामान विभागाने आज उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनेक भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा, रामपूर आणि मुरादाबादमध्ये पाऊस आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. बिहारमध्ये पाऊस कमी होताना दिसत आहे. पण इथे पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. हवामान खात्याच्या मते, बिहारच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, शनिवारी राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नैनीताल आणि डेहराडूनमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशातील 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाटासह वादळासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच भूस्खलनाबाबत लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

Weather Update: यूपी-बिहार-दिल्लीसह 'या' राज्यांत पावसाचा अलर्ट जारी
जगातील सर्वात सुंदर शहरांची यादी जाहिर; जाणून घ्या संपूर्ण यादी

हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाने हरियाणा आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक दिवसांपासून कमजोर असलेला मान्सून पंजाबमध्ये सक्रिय होणार आहे, त्यानंतर अनेक भागात पाऊस पडू शकतो. यामुळे हवामान विभागाने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com