West Bengal News : संशयानं केला घात, बांगलादेशी समजून पश्चिम बंगालच्या दाम्पत्याला तब्बल ३०१ दिवस जेलमध्ये डांबलं

West Bengal News: बांगलादेशी मजूर असल्याच्या संशयावरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
West Bengal News
West Bengal News Saam tv

West Bengal Latest News: कोणताही गुन्हा नाही किंवा कोणता कायदाही मोडला नाही, तरीही फक्त संशयावरून एका निष्पाप आणि निर्दोष दाम्पत्याला एक-दोन नव्हे, तर तब्बल ३०१ दिवस तुरुंगात काढावे लागले आहेत. बर्दवान येथील जोडप्यासोबत ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यांचा दोष इतकाच की पोटासाठी ते दाम्पत्य बेंगळुरूला गेले होते. बांगलादेशी मजूर असल्याच्या संशयावरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कोर्टानं जामीन मंजूर केल्यानंतर घरी जाण्यासाठी त्यांनी ट्रेन पकडली आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला निघाले. (Latest Marathi News)

पलाश आणि शुक्ला अधिकारी या दाम्पत्याचा खडतर प्रवास सुरू झाला होता जुलै २०२२ रोजी. त्यावेळी हे दोघे आणि त्यांचा दोन वर्षांचा चिमुरडा सोबत होता. बांगलादेशी असल्याचा संशय असल्याने या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

West Bengal News
Bhushan Sharan Singh Rally : कुस्तीपटूंबद्दल अनावश्यक वक्तव्ये टाळा, ब्रिजभूषण यांना BJP हायकमांडचे आदेश

आम्ही बांगलादेशी नाहीत. आम्ही याच देशातील म्हणजेच पूर्व बर्दवानमधील जमालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहोत असा सांगण्याचा खूप प्रयत्न केला. गाव, तिथला पत्ता सगळंच सांगितलं. पण पोलिसांनी त्यांचं काहीही एक ऐकलं नाही. सगळे प्रयत्न फोल ठरले.

नंतर काय काय घडलं?

बेंगळुरू पोलिसांचं एक पथक पूर्व बर्दवानमधील पलाशच्या घरी चौकशीसाठी गेलं. जमालपूर बीडीओ यांची भेट घेतली. कागदपत्रे तपासली. पलाशच्या नातेवाइकांनी थेट बेंगळुरू गाठलं. त्यांनी पलाश आणि शुक्लाच्या जामिनासाठी एक वकील केला. त्याचवेळी पोलिसांनी या दाम्पत्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं.

जामीन मिळाला, पण तरीही महिनाभर रखडले

पलाश आणि शुक्ला यांना २८ एप्रिललाच जामीन मंजूर झाला होता. पण तुरुंगातून त्यांना २४ मे रोजी सोडण्यात आलं. कारण तुरुंगातून सुटका होण्यासाठीची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती, अशी माहिती पलाशचा नातेवाइक सुजोय हलदार याने दिली. ते सर्व जण गुरुवारी सकाळी दुरांतो एक्स्प्रेसमधून हावडाकडे रवाना झाले. शुक्रवारी ते आपल्या घरी परतले.

West Bengal News
PM Modi on Shivrajyabhishek Din: शिवरायांचं शौर्य, स्वराज्य , सुशासन आजही प्रेरणादायी, PM मोदींकडून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

पलाशच्या बहिणीचा संघर्ष, सर्व कमाई घालवली

पलाश आणि शुक्ला एकीकडे न्यायासाठी लढत असताना, त्याची बहीण साथी अधिकारी ही या संघर्षात त्यांच्या मागे खंबीरपणे उभी होती. साथी ही ब्युटी पार्लरमध्ये काम करते. तिनं या लढ्यात आपली सगळी कमाई गमावली.

मला २४ मे रोजी साडेनऊ वाजता व्हिडिओ कॉल आला. दादा आणि वहिनी यांची तुरुंगातून सुटका झाली होती. त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलले. त्यांना पाहून माझ्या आईच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहू लागले. ते दोघेही खूप अशक्त दिसत होते, असे साथीने सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com