ममता बॅनर्जींची 'घरवापसी' मोहीम जोरात; ११ महिन्यांत भाजपला ५ मोठे झटके, नेमका काय आहे प्लान?

ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्क्यांवर धक्के देत आहेत.
Mamata Banerjee BJP arjun Singh TMC, Mamata Banerjee Latest Marathi News, paschim Bengal news
Mamata Banerjee BJP arjun Singh TMC, Mamata Banerjee Latest Marathi News, paschim Bengal newsSAAM TV

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या (West Bengal) बॅरकपूर मतदारसंघातील भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) पुन्हा प्रवेश केला. तीन वर्षांनंतर अर्जुन सिंह यांनी घरवापसी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. गेल्या ११ महिन्यांत भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये येणारे अर्जुन सिंह हे पाचवे मोठे नेते आहेत. दुसरीकडे, भाजपच्या आमदारांची संख्या पश्चिम बंगालमध्ये एका वर्षाच्या आत ७७ वरून कमी होऊन ती ७० वर आली आहे. (BJP MP Arjun Singh join TMC)

Mamata Banerjee BJP arjun Singh TMC, Mamata Banerjee Latest Marathi News, paschim Bengal news
Video : ममता बॅनर्जी यांचे बिगर भाजप राज्यातील नेत्यांना पत्र

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून सलग तिसऱ्यांदा विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची नजर आता दिल्लीच्या खुर्चीवर असल्याचे बोलले जाते. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती सुधारण्यावर अधिक भर देत आहेत. २०२४ मध्ये निवडणुकीत संपूर्ण ताकदीसह आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. ममता बॅनर्जीं या 'मिशन' अंतर्गत 'राजकीय वजन' असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी करून घेत आहेत, हे काही दिवसांच्या राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे. (Mamata Banerjee Latest Marathi News)

Mamata Banerjee BJP arjun Singh TMC, Mamata Banerjee Latest Marathi News, paschim Bengal news
हा भाजप आहे, घराणेशाही, वंशवादाच्या चिखलात कमळ फुलवलं; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

२०२४ मध्ये निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्याचे विरोधी पक्षांसमोर मोठे आव्हान आहे. ममता बॅनर्जी यांनी हे अचूक ओळखले आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी आपला बालेकिल्ला अधिक मजबूत कसा होईल, यावर अधिक भर देताना दिसून येतात. त्याची सुरुवात २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकून त्यांनी केली होती, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भाजपमधून तृणमूलमधून आलेले बडे नेते कोण?

पश्चिम बंगालमधील दिग्गज नेते मुकुल रॉय हे सर्वात आधी जून २०२१ मध्ये भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर राजीव बॅनर्जी, बाबुल सुप्रियो, विश्वजीत दास यांसारख्या नेत्यांनीही भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला. राजीव बॅनर्जी त्रिपुरामध्ये पक्षाचे प्रभारी आहेत. तर बाबुल सुप्रियो यांनी खासदारकी सोडून त्यानंतर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले. आता या यादीत अर्जुन सिंह हे नाव जोडले गेले आहे. ते बॅरकपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. तर भाटपारा विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते. २०१९ मध्ये तृणमूलमधून तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com