Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीच्या ४ अलिशान कार गायब, मोठं घबाड असण्याची शक्यता

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अर्पिता मुखर्जी हिच्या ४ अलिशान कार गायब झालेल्या आहेत.
Arpita Mukharjee Latest News
Arpita Mukharjee Latest News SAAM TV

कोलकाता: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्या अडचणी वाढतच आहेत. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. डायमंड सिटी फ्लॅट कॉम्प्लेक्समधून अर्पिताच्या चार अलिशान कार गायब झालेल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे. (Arpita Mukherjee Latest News Update)

अर्पिता मुखर्जीच्या (Arpita Mukherjee) गायब झालेल्या चार अलिशान कारमध्ये मोठी रोकड असण्याची शक्यता आहे, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये ईडीच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. ईडीकडून आता या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

Arpita Mukharjee Latest News
कोलकात्यात अर्पिता मुखर्जी यांच्या घरी कोट्यवधीचं घबाड; 28 कोटी रुपये, 5 किलो सोने जप्त

दरम्यान, अर्पिताची एक अलिशान कार (Car) जप्त करण्यात आली आहे, असे सूत्रांकडून समजते. रिपोर्ट्सनुसार, डायमंड सिटीमधून ज्या कार गायब झाल्या आहेत, त्यातील दोन कार अर्पिता मुखर्जीच्या (Arpita Mukherjee News) नावावर आहेत.

ईडीने (ED) शहरातील चिनार पार्क परिसरात माजी मंत्री पार्थ चटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्याशी संबंधित अन्य एका अपार्टमेंटमध्ये गुरुवारी संध्याकाळी उशिरा छापेमारी केली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली होती. ईडीने मुखर्जीच्या एका फ्लॅटमधून जवळपास २८ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही छापेमारी केली आहे.

Arpita Mukharjee Latest News
Partha Chatterjee: पार्थ चटर्जींवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची कारवाई, मंत्रिमंडळातून हकालपट्टी

ईडीने शिक्षक भरती घोटाळा (Scam) प्रकरणात मुखर्जी हिला अटक केली होती. गेल्या आठवड्याततच शहरातील एका अन्य फ्लॅटमधून २१ कोटी रुपयांहून अधिकची बेहिशेबी रोकड जप्त केली होती. सरकारी शाळा आणि अनुदानित शाळांमध्ये झालेल्या कथित शिक्षक भरती घोटाळ्यावेळी पार्थ चटर्जी यांच्याकडे शिक्षण खात्याचा कार्यभार होता. त्यानंतर त्यांच्याकडून हा विभाग काढून घेण्यात आला होता. ईडीने या प्रकरणात त्यांना अटक केली आहे. या घोटाळा प्रकरणाचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com